Development News : डीपी रोडची कामे निधीअभावी रखडू नयेत
पुणे, महाराष्ट्र मिरर Development News : कोथरूडमधील राजाराम पूल–डीपी रोड परिसरातील वाढती वाहतूककोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.Development New
2 મિનિટ વાંચન

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
पुणे, महाराष्ट्र मिरर Development News : कोथरूडमधील राजाराम पूल–डीपी रोड परिसरातील वाढती वाहतूककोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.Development News
कोथरूडमधील राजाराम पूल–डीपी रोड परिसरातील वाढती वाहतूककोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी आयोजित बैठकीस भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित आंबेकर, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भूतडा, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे, भूमी संपादन विभागाचे बांगर, कार्यकारी अभियंता बांधकाम करपे साहेब, टीडीआर सेल चे कार्यकारी अभियंता जे. बी. पवार, मालमत्ता व्यवस्थापन चे राजेंद्र थोरात, वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.Development News
दरम्यान, बैठकीत १७ जुलै रोजीच्या पाहणीदरम्यान दिलेल्या सूचनांवर झालेल्या कार्यवाहीची माहिती अधिकाऱ्यांनी सादर केली. डीपी रोडवरील अतिक्रमण हटविणे, वाहतुकीचे पुनर्नियोजन, पादचारी सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना, रम्बल स्ट्रिप्स, पादचारी क्रॉसिंग, गतिरोधक तसेच वाहतूक विभागाने सुचविलेल्या विविध सुधारणा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर समाधान व्यक्त करत मंत्री पाटील यांनी उर्वरित कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच, वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्याही सूचना केल्या.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका तसेच आमदार निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले. तसेच, डीपी रोडवरील रस्त्याच्या दुभाजकांमध्ये अनधिकृत १४ पंक्चर (दुभाजक तोडून तयार केलेला मार्ग) असल्याचे निदर्शनास आले असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात सात पंक्चर बंद करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. महालक्ष्मी नर्सरी, सौरभ सोसायटी, ओलीव्हा हॉटेल, वर्तक हेरिटेज, करी लीफ तसेच कोल्हापुरी कट्टा हॉटेलसमोरील पंक्चर बंद करण्यात येणार आहेत. उर्वरित पंक्चरबाबत वाहतूक विभागाच्या सूचनांनुसार निर्णय घेण्यात येणार आहे.Development News
महालक्ष्मी लॉन्स–राजाराम पूल ते पटवर्धन बाग या संपूर्ण मार्गाची वाहतूक शाखेने संयुक्त पाहणी करून वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.
सदर उपाययोजनांचा फायदा केवळ डीपी रोडपुरता मर्यादित राहणार नाही. या बदलांमुळे सिंहगड रस्ता, मेहेंदळे गॅरेज चौक, विठ्ठल मंदिर रस्ता, कर्वेनगर पाणंद रस्ता तसेच परिसरातील इतर महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केली.Development News
Development News
