મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Defense News : सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत होणार

पुणे, महाराष्ट्र मिरर Defense News : राष्ट्रीय सुरक्षेसाठी विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने (Southern Command) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) यांच्यासोबत आयोजित केलेले दोन आठवड्यांचे संयुक्त प्रशिक्षण (Joint Training Capsule) औंध

વઝ
વિદુલા ઝગડે

1 મિનિટ વાંચન

Defense News : सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत होणार

भारतीय लष्कराचे दक्षिण कमांड आणि सीआयएफचे संयुक्त प्रशिक्षण संपन्न

पुणे, महाराष्ट्र मिरर Defense News : राष्ट्रीय सुरक्षेसाठी विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने (Southern Command) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) यांच्यासोबत आयोजित केलेले दोन आठवड्यांचे संयुक्त प्रशिक्षण (Joint Training Capsule) औंध मिलिटरी स्टेशन, पुणे येथे यशस्वीरीत्या पूर्ण झाले.Defense News

‘मिलिटरी-सिव्हिल फ्यूजन’ संकल्पनेअंतर्गत आयोजित या प्रशिक्षणामध्ये सीआयएसएफ च्या एकशे दोन जवानांचा समावेश होता. त्यामध्ये दहा महिला जवानांचा समावेश होता. या जवानांनी भारतीय लष्कराच्या सैनिकांसोबत प्रत्यक्ष परिस्थितीवर आधारित सरावात सहभाग घेतला.Defense News

या संयुक्त प्रशिक्षणामुळे भारतीय लष्कर आणि सीआयएसएफ यांच्यातील समन्वय, परस्पर विश्वास आणि संयुक्त कारवाईची क्षमता अधिक बळकट झाली आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या सुरक्षा आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी अशा प्रकारचे संयुक्त प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे दक्षिण कमांडने स्पष्ट केले. भारतीय लष्कराने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये अधिक सुसंवाद आणि समन्वय निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा या उपक्रमाद्वारे पुन्हा एकदा प्रत्यय दिला आहे. Defense News

देण्यात आलेले प्रशिक्षण

शहरी भागातील दहशतवादविरोधी कारवाया, संयुक्त ऑपरेशनल ड्रिल्स, प्रतिसाद यंत्रणा, रणनीती आणि अंतर्गत सुरक्षेच्या परिस्थितींना सामोरे जाण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. वास्तव परिस्थितीचे अनुकरण करून विविध ऑपरेशनल सराव घेण्यात आले. तसेच आधुनिक सुरक्षा आव्हानांबाबत दोन्ही दलांमध्ये अनुभवांची देवाणघेवाण करण्यात आली.

શેર કરો