મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Dadar Accident News : वरळीत चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला! विरुद्ध दिशेच्या कारला वाचवताना बेस्टची बस चढली दुभाजकावर

Worli Latest Bus Accident News : टाटा कंपनीची भाडेतत्त्वावरील बस 'यु-टर्न' घेणाऱ्या कारमुळे अनियंत्रित; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

मुंबई :- वरळी परिसरात गुरुवारी सकाळी बेस्टच्या ताफ्यातील एका बसला अपघात झाला. समोरून येणाऱ्या एका कारने अचानक 'यु-टर्न' घेतल्याने, त्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात बेस्ट बस थेट रस्ता दुभाजकावर चढली. बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकी घटना कशी घडली?

वरळी आगारातील टाटा कंपनीची भाडेतत्त्वावरील बस (मार्ग क्रमांक 167) सकाळी पी. के. कुरणे चौक बस स्थानकाकडून प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या दिशेने (अप दिशा) प्रवास करत होती. बस 'बॉम्बे डाईंग' बस थांब्याजवळ पोहोचली असताना, अचानक विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका मोटारगाडीने नियमांचे उल्लंघन करत 'यु-टर्न' घेतला.

चालकाचे प्रसंगावधान आणि बचाव

समोरून अचानक आलेल्या कारला जोरदार धडक बसू नये, यासाठी बस चालकाने तातडीने ब्रेक लावले. मात्र, वेग आणि वळण यामुळे बसचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावरील दुभाजकावर चढली. बस दुभाजकावर अडकून पडल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु कोणालाही साधी जखमही झाली नाही.

શેર કરો