D.Y. Patil B-School Case : डी. वाय. पाटील बी-स्कूलमध्ये ४.९८ कोटींचा घोटाळा
पुणे, महाराष्ट्र मिरर
3 મિનિટ વાંચન

D.Y. Patil B-School Case : गोपनीय माहितीची चोरी आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केल्याचाही संशय; आरोपी अमोल गावंडे दुबईत असल्याची माहिती
पुणे, महाराष्ट्र मिरर

D.Y. Patil B-School Case : ताथवडे येथील नामांकित 'डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल'चे (D.Y. Patil B-School Case ) माजी संचालक अमोल आनंदराव गावंडे यांच्याविरुद्ध संस्थेच्या निधीतून तब्बल ४,९८,६६,०००$ रुपयांचा (सुमारे पावणेपाच कोटी) कथित अपहार केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक अपहारासोबतच संस्थेचा गोपनीय डेटा चोरणे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केल्याचाही त्यांच्यावर संशय आहे. (D.Y. Patil B-School Case 4 crore scam gavande)
संस्थेने केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण अहवालात अमोल गावंडे यांनी आपल्या कार्यकाळात पदाचा गैरवापर करून हा मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले होते. यानंतर संस्थेच्या वतीने अधिकृत तक्रार देण्यात आली होती. (D.Y. Patil B-School Case ) पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे प्राप्त झालेल्या अर्ज चौकशीनंतर ४ जुलै २०२६ रोजी हा गुन्हा रीतसर नोंदविण्यात आला.(D.Y. Patil B-School Case )
Pimpri Chinchwad Rain : पूरबाधित १८८० व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
संशयित आरोपी अमोल गावंडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ३१६(४), ३१८(४), २४८, ३३६ व ३४०, तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) अधिनियम, २००० मधील कलम ४३, ६६ आणि ७२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (D.Y. Patil B-School Case )
Alandi Flood: इंद्रायणीने ओलांडली धोक्याची पातळी; २५० वारकरी अडकले
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासात सहभागी होण्यासाठी पोलिसांनी अमोल गावंडे संस्थेने केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण अहवालात अमोल गावंडे यांनी आपल्या कार्यकाळात पदाचा गैरवापर करून हा मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले होते. यानंतर संस्थेच्या वतीने अधिकृत तक्रार देण्यात आली होती. (D.Y. Patil B-School Case ) पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे प्राप्त झालेल्या अर्ज चौकशीनंतर ४ जुलै २०२६ रोजी हा गुन्हा रीतसर नोंदविण्यात आला.(D.Y. Patil B-School Case )

यांना अनेकवेळा समन्स बजावले होते. मात्र, त्यांनी पोलिसांच्या नोटिसीला दाद न देता सातत्याने चौकशीस अनुपस्थित राहणे पसंत केले. ते तपासात कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गावंडे हे सध्या भारताबाहेर निघून गेले असून ते दुबई येथे वास्तव्यास असण्याची शक्यता आहे. (D.Y. Patil B-School Case )
Missing Link : ‘मिसिंग लिंक’ की ‘भ्रष्टाचाराची लिंक’? पहिल्याच पावसात प्रकल्पाचे पितळ उघडे!
Read More News on Maharashtra Mirror
या हाय-प्रोफाइल प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी-चिंचवड पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. गावंडे यांनी हा आर्थिक गैरव्यवहार नेमका कसा केला, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा संपूर्ण शोध घेणे तसेच संस्थेचा चोरीला गेलेला गोपनीय डेटा परत मिळविणे या दृष्टीने पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. (D.Y. Patil B-School Case )
Maval : मावळ तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना; घरावर कोसळली दरड, एकाचा मृतदेह हाती
0 3 1 minute rea

Maval : एकाचा मृतदेह हाती; संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
पुणे, महाराष्ट्र मिरर
Maval : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या पाटण गावात पहाटेच्या सुमारास एका घरावर भीषण दरड कोसळली. या दुर्दैवी घटनेत संपूर्ण घर ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून, एकाच कुटुंबातील सदस्य या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे. (maval patan village landslide)
पहाटेच्या सुमारास काळाचा घाला
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवार (६ जुलै) रोजी पहाटे ६:०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरमाथ्यावरील माती आणि खडक निखळले आणि ते थेट पायथ्याशी असलेल्या घरांवर येऊन कोसळले. सर्व नागरिक गाढ झोपेत असतानाच ही दुर्घटना घडल्यामुळे कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही.(Maval)
Missing Link : ‘मिसिंग लिंक’ की ‘भ्रष्टाचाराची लिंक’? पहिल्याच पावसात प्रकल्पाचे पितळ उघडे!
एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश, शोधमोहीम सुरू
घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार, स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेचे गांभीर्य पाहून तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पुणे येथील ५ व्या बटालियनला पाचारण करण्यात आले. ३० जवानांचे हे विशेष पथक अत्याधुनिक शोध उपकरणांसह घटनास्थळी दाखल झाले आहे.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
