हॉटेलमध्ये बिल देण्यावरून झालेल्या वादात ग्राहकांना मारहाण
पिंपळे गुरव येथील मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दोघांना जीवे मारण्याची धमकीही
1 મિનિટ વાંચન

पिंपळे गुरव येथील मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दोघांना जीवे मारण्याची धमकीही
पिंपरी: पिंपळे गुरव येथील एका हॉटेलमध्ये बिल देण्याच्या कारणावरून सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (२६ एप्रिल) रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेल वॉल्टच्या पार्किंगमध्ये घडली.

या प्रकरणी सुरज शंकर झांजुर्णे (३२, भोसरी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास अनिलकुमार सेवाणी (२५, पिंपरी), आशिष सुनिल भेगडे (२९, शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे), प्रेम दिलबहादूर थापा (२१, काशिदनगर, पिंपळे गुरव) आणि अनिलकुमार अर्जनदास मेवाणी (५२, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलचे मालक आणि कर्मचारी एका ग्राहकासोबत बिलावरून वाद घालत होते. फिर्यादी आणि त्यांचे मित्र हा वाद सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी 'तुम्ही आमच्या मध्ये का येता' असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि मुख्य आरोपीने हातातील कड्याने फिर्यादीच्या तोंडावर, नाकावर मारून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
Customers beaten up in hotel over bill dispute
