મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Crime : पालखी सोहळ्यात दागिने पळवणारी महिला टोळी जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

आळंदी, महाराष्ट्र मिरर

ધઓ
ધનશ્રી ઓતારી

2 મિનિટ વાંચન

Crime

Crime : माऊलींच्या पालखीत वेश बदलून दर्शन घेताना चालणाऱ्या पोलिसांनी सोने लंपास करणाऱ्या महिला टोळीला रंगेहात पकडले!

आळंदी, महाराष्ट्र मिरर

Crime : आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात लाखो वारकऱ्यांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने चालाखीने चोरांचा डाव उधळून लावल्याची घटना समोर आली आहे. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या वेषात साध्या कपड्यांमध्ये गस्त घालणाऱ्या गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने, एका महिला भाविकाच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोन महिलांना रंगेहात अटक केली आहे. त्यांच्याकडून १,५०,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ( crime PCMC Police palkhi sohala gold theft )


पालखी सोहळ्यादरम्यान लाखो भाविक आळंदीमध्ये आणि पालखी मार्गावर गर्दी करतात. या गर्दीचा फायदा घेऊन सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी होण्याची दाट शक्यता असते. या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला कडक दक्षता घेण्याचे आदेश दिले होते. Crime

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

त्यानुसार, गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या चार विशेष पथकांची रचना करण्यात आली. यातील एका महत्त्वाच्या पथकामध्ये स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस अंमलदार सुरेखा बोरसे, बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोहाडे, दिलीप राठोड, निखिल फापाळे व स्वप्नील महाले यांचा समावेश होता. हे पथक आळंदीपासून ते बोपखेल फाट्यापर्यंत माऊलींच्या पालखीच्या दोन्ही बाजूंना वारकऱ्यांमध्ये साध्या पोशाखात पायी चालत गस्त घालत होते. ( Crime )

Amol kolhe : ४८ तासांनंतरही खासदार कोल्हे घटनास्थळापासून दूरच

दरम्यान, पालखी सोहळा मार्गक्रमण करत असताना दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला. चऱ्होली फाटा येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी महिला सुनिता नारायणराव राऊत (वय ५० वर्ष) या माऊलींच्या रथाजवळ जात दर्शन घेण्यासाठी पुढे आल्या. दर्शन घेत असताना झालेल्या प्रचंड गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पाठीमागे दोन संशयित महिला उभ्या राहिल्या.

सुनिता राऊत या दर्शन घेत असतानाच, पाठीमागील एका महिलेने त्यांच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून सोबत असलेल्या दुसऱ्या महिला साथीदाराकडे सुपूर्द केले. ( Crime )

Moshi Building Collapse : त्या इमारतीचे दोन मजले अनधिकृत ?

ही बाब लक्षात येताच वारकऱ्यांच्या वेषात चालणारे पोलीस अंमलदार दिलीप राठोड आणि स्वप्नील महाले यांचे लक्ष या हालचालीकडे होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांना आवाज दिला. पथकाने अत्यंत तत्परतेने घेरून त्या दोन्ही महिलांना चोरीच्या मालासह जागेवरच रंगेहात पकडले.

पोलिसांनी स्टाफच्या मदतीने महिलांची कसून चौकशी केली असता, नयना विष्णू काळे (वय २० वर्ष, रा. धारेगाव, मिटमिटा छावणी, संभाजीनगर) असे एका महिलेचे नाव असून दुसरी महिला ही अल्पवीयन असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेले १३ ग्रॅम वजनाचे, १,५०,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले आहे. ( Crime )

Moshi Building Collapse : मोशी कचरा डेपोच्या भ्रष्टाचाराचा आका कोण ?

याप्रकरणी पीडित महिला सुनिता नारायणराव राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. ३१९/२०२६ नुसार नवीन कायद्यान्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९ (४) (चोरी/हिसकावणे) आणि ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

શેર કરો