CRIME NEWS : गोखलेनगरमध्ये तरुणाचा बेसबॉल स्टिकने हल्ला करून खून
जवळच्या मित्रांनीच केला हल्ला; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
1 મિનિટ વાંચન

जवळच्या मित्रांनीच केला हल्ला; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: पूर्ववैमनस्यातून 20 वर्षीय तरुणाचा बेसबॉल स्टिकने हल्ला करून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील गोखलेनगर परिसरात घडली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.CRIME NEWS

मृत तरुणाचे नाव हर्ष मच्छिंद्र जाधव (वय 20, रा. गोखलेनगर) असे आहे. हर्ष हा कामधंदा करत होता. त्याच्यावर यापूर्वी मारामारीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.CRIME NEWS
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष जाधव हा गोखलेनगरमधील आपल्या घराजवळ एका रिक्षामध्ये बसला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन ते तीन जणांनी त्याला रिक्षाबाहेर ओढले आणि बेसबॉल स्टिकने बेदम मारहाण केली. हल्ल्यादरम्यान त्याच्या कानावर जोरदार वार झाल्याने गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाल्यानंतर जखमी हर्षने आरडाओरडा केला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.CRIME NEWS
या घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले की, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटली असून, ते मृत हर्षचे परिचित आणि जवळचे मित्र असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून खुनामागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.
CRIME NEWS
