CRIME NEWS : लग्नाच्या अमिषाने तरूणांची फसवणूक
आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश ; नवरीसह चौघांवर गुन्हा दाखल
2 મિનિટ વાંચન

आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश ; नवरीसह चौघांवर गुन्हा दाखल
पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS : लग्नासाठी मुलगी मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुणांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा आळेफाटा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लग्नानंतर अवघ्या चोविस तासांत नवरी पळून जाण्याच्या तयारीत असताना हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नवरीसह चार जणांविरुद्ध आळेफाटा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

अमोल पिंजारी, संगीता शिंदे, सोनाली भोसले, राधा रमेश काळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अजय भीमराज रोहोम (रा. एकरुखे, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.CRIME NEWS
तक्रारीनुसार, अजय रोहोम यांच्या विवाहासाठी मध्यस्थामार्फत आळे येथील एजंट संगीता शिंदे हिच्याशी संपर्क साधण्यात आला होता. शिंदे हिने राधा काळे हिला वधू म्हणून दाखवून विवाहासाठी आर्थिक व्यवहाराची मागणी केली. त्यानुसार २० जून रोजी आळे येथे अजय आणि राधा यांचा विवाह पार पडला. या विवाहासाठी एजंटकडे तब्बल १ लाख ६० हजार रुपये देण्यात आले.
दुसऱ्या दिवशी, २१ जून रोजी कोपरगाव येथे पारंपरिक रितीरिवाजांनुसार पुन्हा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर अजय नवरीला घेऊन आपल्या घरी परतला. मात्र त्याच दिवशी संध्याकाळी घराबाहेर काळ्या काचा असलेली पांढऱ्या रंगाची व्हर्ना कार येऊन थांबली. ती कार पाहताच नवरी राधा घरातून बाहेर पडून गाडीच्या दिशेने धावू लागली. घरच्यांनी तिला अडविल्याने कारचालकाने वाहन भरधाव वेगाने पळवून नेल्याचे सांगण्यात आले.CRIME NEWS
या घटनेनंतर संशय बळावल्याने अजय आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राधाकडे चौकशी केली. चौकशीदरम्यान तिने धक्कादायक कबुली दिली. संबंधित कार तिला घेऊन जाण्यासाठीच आली होती. आळेफाटा येथे जाऊन एजंटकडून व्यवहारातील स्वतःचा हिस्सा घेऊन ती परत आपल्या घरी जाणार होती, असे तिने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.CRIME NEWS
आपली नियोजनबद्ध फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अजय रोहोम यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणामागे कार्यरत असलेल्या आंतरजिल्हा टोळीचा शोध सुरू केला आहे.CRIME NEWS
या प्रकरणाचा पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. विवाहाच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या अशा टोळ्यांविरोधात नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
CRIME NEWS
