CRIME NEWS : बावधन येथे गांजा विक्री प्रकरणी महिलेला अटक
एकूण १७ हजार रुपये किमतीचा ३४० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त
1 મિનિટ વાંચન

एकूण १७ हजार रुपये किमतीचा ३४० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त
पिंपरी, CRIME NEWS: बेकायदेशीररित्या आणि विनापरवाना विक्रीच्या उद्देशाने गांजा जवळ बाळगणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी (२९ जून) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जाधववस्ती, रायन स्कूल समोर, बावधन येथे रोडवर करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अरुण नरळे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत संबंधित महिला आरोपीच्या ताब्यात एकूण १७ हजार रुपये किमतीचा ३४० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. हा अमली पदार्थ ती कोणत्याही अधिकाराशिवाय व बेकायदेशीररित्या विक्रीसाठी स्वतःच्या ताब्यात बाळगून असताना मिळून आली. बावधन पोलीस तपास करीत आहेत.
CRIME NEWS
