મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

CRIME NEWS : पुणे रेल्वे स्थानकावर अनधिकृत विक्रेत्यांना दणका

२७ जणांवर गुन्हा दाखल; ४२० पाण्याच्या बाटल्या जप्त

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

CRIME NEWS : पुणे रेल्वे स्थानकावर अनधिकृत विक्रेत्यांना दणका

२७ जणांवर गुन्हा दाखल; ४२० पाण्याच्या बाटल्या जप्त

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: पुणे रेल्वे स्थानक आणि रेल्वेगाड्यांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत विक्रीविरोधात मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने मंगळवारी (दि.२२) धडक कारवाई करत २७ अनधिकृत फेरीवाले आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले. या कारवाईत ५४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मान्यता नसलेल्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या ४२० बाटल्यांचा साठाही जप्त करण्यात आला.CRIME NEWS

पुणे विभागाच्या वाणिज्य विभागाने रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) सहकार्याने ही विशेष तपासणी मोहीम राबवली.

रेल्वे परिसर आणि रेल्वेगाड्यांमध्ये परवानगीशिवाय व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर रेल्वेच्या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. तसेच, प्रत्येक आरोपीकडून दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तपासणीदरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर एका ट्रॉलीमधून मान्यता नसलेल्या पिण्याच्या पाण्याच्या ३५ खोक्यांतील ४२० बाटल्या जप्त करण्यात आल्या. रेल्वे परिसरात अनधिकृत उत्पादनांची विक्री आणि वितरण रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.CRIME NEWS

मध्य रेल्वे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी सांगितले की, प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि अधिकृत उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध आहे. अनधिकृत विक्रीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर आणि सुविधांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा विक्रेत्यांविरोधात नियमित आणि अचानक तपासण्या सुरूच राहणार आहेत.CRIME NEWS

वाणिज्य विभाग आणि आरपीएफ यांच्या संयुक्त समन्वयातून भविष्यातही विशेष मोहिमा राबविण्यात येतील. गर्दीच्या स्थानकांवर आणि संवेदनशील भागांमध्ये तपासण्या अधिक तीव्र करण्यात येणार असून प्रवाशांमध्येही जनजागृती केली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ, पेये आणि पॅकेज्ड पिण्याचे पाणी खरेदी करण्याचे आवाहनही बेहरा यांनी केले आहे.

CRIME NEWS

શેર કરો