મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

CRIME NEWS : आंबेगाव येथे मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा जेरबंद

पोलिसांकडून ३ मोटारसायकल जप्त

PG
Prashik Ghaste

2 મિનિટ વાંચન

CRIME NEWS : आंबेगाव येथे मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा जेरबंद

पोलिसांकडून ३ मोटारसायकल जप्त


पुणे CRIME NEWS
: मौजमजेसाठी मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला आंबेगाव पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या ताब्यातून चोरीच्या एकूण ३ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आंबेगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली.CRIME NEWS


अजय मर्याप्पा जावीर (वय २९ वर्षे, व्यवसाय- बिगारी, रा. आंबेगाव खुर्द) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुप्त बातमीदाराकडून मिळाली माहिती
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जून २०२६ रोजी आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त सुरू होती. यावेळी पोलीस अंमलदार सचिन गाडे आणि प्रमोद भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील चोरीची मोटारसायकल घेऊन आरोपी अजय जावीर हा जांभूळवाडी तलावाजवळ बसला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.CRIME NEWS

तलावाजवळ सापळा रचून अटक
माहिती मिळताच तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे आणि त्यांच्या अंमलदारांच्या पथकाने जांभूळवाडी तलावाजवळ जाऊन छापा टाकला. तेथे एका मोकळ्या जागेत संशयास्पद रित्या दुचाकीवर बसलेल्या अजय जावीरला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक सखोल चौकशी केली असता, त्याने ती मोटारसायकल १४ जून २०२६ रोजी जांभूळवाडी रोडवरील शनिनगर चौकात असलेल्या हरिओम हार्डवेअर समोरून चोरल्याची कबुली दिली.

इतर भागांतूनही केल्या होत्या चोऱ्या
पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यातील मोटारसायकल जप्त करून त्याची कसून चौकशी केली. तपासादरम्यान त्याने भारती विद्यापीठ आणि पुणे स्टेशन परिसरातूनही दुचाकी चोरल्याचे मान्य केले. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ३ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.CRIME NEWS

यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई
सदरची यशस्वी कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-२) मिलिंद मोहिते, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (भारती विद्यापीठ विभाग) राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.CRIME NEWS


तसेच आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकवडे, शिवाजी पोटोळे आणि फिरोज शेख यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली.

CRIME NEWS

શેર કરો