મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

CRIME NEWS : कापड व्यापाऱ्याला दोन कोटींसाठी धमकावले

उत्तमनगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

Crime News
pimpri chinchwad crime

उत्तमनगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: पुण्यात बिश्नोई टोळीच्या नावाने खंडणी मागण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, उत्तमनगर परिसरातील ४७ वर्षीय कापड व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देत २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या आठवडाभरात पुण्यात नोंद झालेली ही तिसरी खंडणीची घटना आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार उत्तमनगरमध्ये कापडाचा व्यवसाय करत असून बांधकाम क्षेत्रातही कार्यरत आहेत. शनिवारी सकाळी त्यांना इंटरनेट कॉलद्वारे स्वतःची ओळख “शुभम लोणकर” अशी सांगणाऱ्या व्यक्तीने संपर्क साधला. संभाषणादरम्यान त्या व्यक्तीने व्यापाऱ्याच्या व्यवसायाची, वाहनाच्या नोंदणी क्रमांकाची, दैनंदिन हालचालींची तसेच उत्तमनगर-शिवाणे व्यापारी संघटनेतील त्यांच्या पदाची अचूक माहिती सांगितली. त्यानंतर कुटुंबाची माहिती असल्याचा दावा करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि २ कोटी रुपये तयार ठेवण्याचे सांगण्यात आले.CRIME NEWS

धमकी मिळताच व्यापाऱ्याने तातडीने उत्तमनगर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी त्यांच्या नऱ्हे येथील निवासस्थान, कापडाचे दुकान आणि बांधकाम कंपनीच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले की, इंटरनेट कॉल करणाऱ्याची ओळख पटवण्यासाठी आणि कॉलचा उगम शोधण्यासाठी गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू आहे.

पुण्यात खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ

गेल्या काही दिवसांत पुण्यात अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. २२ जून रोजी वानवडीतील पोलाद उद्योजकाकडे ५० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर मंतरवाडी येथील त्यांच्या कारखान्याबाहेर गोळीबार करण्यात आला. २३ जून रोजी वडकी येथील औषध व्यापाऱ्याकडे २ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. रावेत येथील एका महिलेने तिच्या दुबईस्थित पतीकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची तक्रार पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे दिली आहे.CRIME NEWS

बिश्नोई टोळीच्या नावाचा गैरवापर?

अल्पावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अशा चार घटना घडल्याने बिश्नोई टोळीच्या नावाचा गैरवापर करून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून, व्यावसायिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

CRIME NEWS

શેર કરો