Crime News : पेट्रोल पंपाच्या कार्यालयातून दहा हजार लंपास
यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
1 મિનિટ વાંચન

यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी, Crime News : एका पेट्रोल पंपाच्या कार्यालयात शिरून चोरट्याने कर्मचाऱ्याच्या खिशातील दहा हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना दौंड तालुक्यातील यवत येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.Crime News

दीपक शेगर (वय १९, रा. पाटस, ता. दौंड) यांनी याबाबत फिर्याद दिली. Crime News
दीपक शेगर हे सिद्धिविनायक सर्व्हिस स्टेशन या पेट्रोल पंपावर काम करतात. मंगळवारी पहाटे कार्यालयात झोपलेले असताना चोरट्याने कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील दहा हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा केला. सकाळी जाग आल्यानंतर रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, पुढील तपास सुरू आहे.
Crime News
