CRIME NEWS : पुण्यात एमडी ड्रग्जसह राजस्थानचा युवक जेरबंद; २१ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-१ ची मोठी कारवाई
1 મિનિટ વાંચન

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-१ ची मोठी कारवाई
पुणे CRIME NEWS: गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-१ ने मोठी कारवाई करत सुमारे २१.०८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जची विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जून २०२६ रोजी अमली पदार्थ विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक मुंढवा-खराडी रोड परिसरात गस्त घालत होते. यावेळी एच.पी. पेट्रोल पंपाजवळील बसस्टॉप परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या उभी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून १०४ ग्रॅम ९२ मिलिग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ आढळून आला.CRIME NEWS
अमली पदार्थ, मोबाईल जप्त
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इमरान युसुफ शेख (वय ३८) असे असून तो खराडी येथील थिटेनगर परिसरात राहत आहे. मूळचा तो राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्याचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत २०.९८ लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज तसेच १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण २१.०८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.CRIME NEWS
याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने हे ड्रग्ज कुठून आणले आणि कोणाला विक्री करण्याचा त्याचा उद्देश होता, याचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक-१ ने केली.CRIME NEWS
CRIME NEWS
