મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

CRIME NEWS : काळेपडळमध्ये पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

सराईत तडीपार गुंडासह तिघांना जंगलातून बेड्या; २ गावठी पिस्तुले, ४ मॅगझिन व ४ जिवंत काडतुसे जप्त

PG
Prashik Ghaste

2 મિનિટ વાંચન

CRIME NEWS : काळेपडळमध्ये पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

सराईत तडीपार गुंडासह तिघांना जंगलातून बेड्या; २ गावठी पिस्तुले, ४ मॅगझिन व ४ जिवंत काडतुसे जप्त

पुणे CRIME NEWS : पुणे शहर पोलीस दलाच्या काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अत्यंत धडाकेबाज कामगिरी करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून कुख्यात तडीपार गुंडासह त्याच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीकडून पोलिसांनी तब्बल १ लाख ४४ हजार रुपये किमतीची दोन बेकायदेशीर देशी बनावटीची पिस्तुले (गावठी कट्टे), दोन अतिरिक्त मॅगझिन आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या आरोपींना जेरबंद करून काळेपडळ पोलिसांनी परिसरात मोठा घातपात घडवण्याचा किंवा गंभीर गुन्हा करण्याचा त्यांचा कट उधळून लावला आहे.CRIME NEWS: Police's impressive performance in Kalepadal

या आरोपींविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी १) आकाश संतोष भारती (वय २७ वर्षे, रा. तरवडे वस्ती, पुणे), २) दीपक राम बिस्ट (वय २० वर्षे, रा. हांडेवाडी रस्ता, हडपसर) आणि ३) वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला कुख्यात गुन्हेगार गणेश बबन लोंढे (वय २५ वर्षे, रा. पांढरे मळा, हडपसर) या तिघांना अटक केली आहे. संशयित आरोपींविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३(५), शस्त्र कायदा कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५, १४२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.CRIME NEWS: Police's impressive performance in Kalepadal

या गुन्ह्याचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करत आहेत.

गुप्त सुचनेआधारे केली कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २) काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे, गिरीराज जगदाळे, अतुल पंधरकर आणि महादेव शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आकाश संतोष भारती आणि हद्दपार असलेला गणेश लोंढे हे त्यांच्या दोन साथीदारांसह प्राणघातक अग्निशस्त्रांसह हेवन पार्ककडून लक्ष्मी पार्ककडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर अंधारात दबा धरून उभे असून ते परिसरामध्ये एखादा मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबले आहेत.

पोलीस पथकाने तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या आदेशानुसार हेवन पार्क ते लक्ष्मी पार्क रस्त्यावरील मोकळ्या मैदानाच्या आडबाजूला संपूर्ण बंदोबस्तासह सापळा रचला आणि आरोपी आकाश भारती आणि त्याचा साथीदार दीपक बिस्ट या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले, मात्र रात्रीच्या अंधाराचा आणि झाडीझुडपांचा फायदा घेऊन कुख्यात तडीपार आरोपी गणेश लोंढे तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला.CRIME NEWS

घातक हत्यारे जप्त
आकाश भारती आणि दीपक बिस्ट यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक अतिरिक्त मॅगझिन आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली. दरम्यान, फरार झालेल्या गणेश लोंढे याला पोलिसांनी गुरुवारी (ता. ४) दगाई माता जंगलाच्या परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक अतिरिक्त मॅगझिन आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस दलाचे परिमंडळ ६ चे पोलीस उपआयुक्त जीवन बेनीवाल, हडपसर विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या धाडसी कारवाईत साहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव तसेच पोलीस अंमलदार प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे आणि गिरीराज जगदाळे हे सहभागी झाले होते.CRIME NEWS

CRIME NEWS

શેર કરો