CRIME NEWS : पौड घाटात विवस्त्र तरुणाचा धिंगाणा
कारचे सनरूफ फोडले, पोलिसांच्या ताब्यात
1 મિનિટ વાંચન

कारचे सनरूफ फोडले, पोलिसांच्या ताब्यात
पुणे CRIME NEWS: मुळशी तालुक्यातील पौड घाट परिसरात एका विवस्त्र तरुणाने भर रस्त्यात धिंगाणा घालत वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडवली. सुमारे ३५ ते ४० वर्षीय तरुणाने रस्त्याच्या मधोमध उभे राहून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडवण्याचा प्रयत्न केला.CRIME NEWS

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने एका कारवर चढून तिचे सनरूफ फोडले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घाटात काही काळ वाहतूक कोंडीही झाली.CRIME NEWS
घटनेची माहिती मिळताच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रसंगावधान राखत संबंधित तरुणाला पकडून ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी त्याला पौड पोलिसांच्या स्वाधीन केले.CRIME NEWS
दरम्यान, तरुणाची मानसिक स्थिती बिघडलेली होती का किंवा त्यामागे अन्य काही कारण होते का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
CRIME NEWS
