મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

CRIME NEWS : अल्पवयीनाकडून दुचाकीस्वाराची जबरी चोरी; १ हजार रुपये हिसकावले

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS : खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विधीसंघर्षित बालकाने दुचाकीस्वाराकडून जबरी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

CRIME NEWS : अल्पवयीनाकडून दुचाकीस्वाराची जबरी चोरी; १ हजार रुपये हिसकावले

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS : खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विधीसंघर्षित बालकाने दुचाकीस्वाराकडून जबरी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०२(२) अन्वये गुन्हा दाखल करून बालकाला ताब्यात घेतले आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर, गुलटेकडी येथील ५५ वर्षीय व्यक्ती २७ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून लव्हज चौक परिसरातून जात होते. यावेळी आरोपी बालक त्यांच्या जवळ आला आणि जबरदस्तीने त्यांच्या खिशातील १,००० रुपये हिसकावून पळून गेला. घटनेनंतर पीडिताने तत्काळ खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.CRIME NEWS

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू करून संबंधित विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी सुरू असून चोरीमागील उद्देश आणि यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.

CRIME NEWS

શેર કરો