મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

CRIME NEWS : काळेपडळ पोलिसांची कारवाई; एक लाखाचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य माल जप्त; एकाला अटक

अवैध तंबाखू पुरवठा साखळीतील इतर संबंधितांचा शोध सुरू

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

CRIME NEWS : काळेपडळ पोलिसांची कारवाई; एक लाखाचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य माल जप्त; एकाला अटक

अवैध तंबाखू पुरवठा साखळीतील इतर संबंधितांचा शोध सुरू

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: काळेपडळ पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधी गुटखा, पानमसाला, सुपारी व तंबाखूजन्य पदार्थांचा अवैध साठा करून विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी एका ठिकाणी छापा टाकून मोठा साठा जप्त करण्यात आला.CRIME NEWS

काळेपडळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलमे १२३, २२३, २७४, २७५ तसेच सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे केली कारवाई
पोलीस अंमलदार अमोल फडतरे व महादेव शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काळेपडळमधील कंजारभट वस्ती येथे सापळा रचण्यात आला. त्यावेळी शेराराम कानाराम देवासी (वय २४, रा. काळेपडळ, हडपसर) हा प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी नेत असताना पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याच्याकडून १५ हजार ४२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.CRIME NEWS

चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या एका मित्राकडून हा माल विक्रीसाठी मिळाल्याची कबुली दिली. तसेच त्याने काळेपडळ येथील केतकेश्वर कॉलनीमध्ये एका बंद खोलीत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून सुमारे १ लाख ९ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला.CRIME NEWS

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग), पोलीस उपायुक्त परिमंडळ-६, सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग तसेच काळेपडळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला असून, या अवैध तंबाखू पुरवठा साखळीतील इतर संबंधितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

CRIME NEWS

શેર કરો