મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

CRIME NEWS : केतन अगरवाल हत्या प्रकरणाचा तपासाने घेतला वेग

सियाच्या दोन मैत्रिणींसह यश मित्तलला चौकशीसाठी समन्स

PG
Prashik Ghaste

3 મિનિટ વાંચન

CRIME NEWS : केतन अगरवाल हत्या प्रकरणाचा तपासाने घेतला वेग

सियाच्या दोन मैत्रिणींसह यश मित्तलला चौकशीसाठी समन्स

पुणे CRIME NEWS: लोहगड किल्ल्यावरील बहुचर्चित केतन अगरवाल हत्या प्रकरणाच्या तपासात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाची व्याप्ती आणखी वाढवली आहे. या प्रकरणात संशयित सिया गोयलच्या अत्यंत जवळच्या दोन मैत्रिणींसह रेणू मित्तल आणि नरेंद्र मित्तल यांचा मुलगा यश मित्तल यांना चौकशीसाठी लोणावळा पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.CRIME NEWS

विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणातील प्रत्येक दुव्याचा बारकाईने तपास करत आहे. तपासादरम्यान सिया गोयल तिच्या दोन जवळच्या मैत्रिणींशी वैयक्तिक तसेच महत्त्वाच्या गोष्टी नियमितपणे शेअर करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे या दोघींकडून हत्येच्या कटासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांना वाटत आहे.CRIME NEWS

सिया गोयलचे कथित धक्कादायक वर्तन
तपासातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे केतन अगरवालला दरीत ढकलल्यानंतर सिया गोयलचे कथित वर्तन. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, प्रियकर चेतन चौधरीने केतनला कड्यावरून ढकलल्यानंतर सियाने तात्काळ आरडाओरडा केला नाही. उलट ती जवळपास दोन मिनिटे शांत राहून आजूबाजूला कोणी आहे का आणि चेतन सुरक्षितपणे घटनास्थळावरून निघून गेला आहे का, याची खात्री करत होती, असा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

याशिवाय, केतन दरीत कोसळल्यानंतर त्याला मदत मिळावी म्हणून स्थानिक नागरिक किंवा पोलिसांना तत्काळ कळविण्याऐवजी सियाने प्रथम तिच्या आईला फोन करून "केतन किल्ल्यावरून खाली पडला आहे," अशी माहिती दिल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर सुमारे पंधरा मिनिटे तिने कुटुंबीय आणि नातेवाइकांशी संपर्क साधला. या विलंबामुळे गंभीर जखमी झालेल्या केतनला तातडीची मदत मिळू शकली नाही, असेही तपासात स्पष्ट झाले आहे.CRIME NEWS

संपूर्ण घटनेची 'क्राइम टाइमलाइन'
पोलिसांच्या हाती या संपूर्ण घटनेची 'क्राइम टाइमलाइन' लागली असून, हत्येपूर्वी झालेला संपर्क, मोबाईल कॉल, संदेश आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे. या सर्व घडामोडींमुळे हा कट पूर्वनियोजित आणि थंड डोक्याने रचल्याचा संशय अधिक बळावला असून, या बहुचर्चित प्रकरणात येत्या काही दिवसांत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे. वडगाव मावळ न्यायालयाने सोमवारी हा आदेश देत तपासासाठी पोलिसांना आणखी वेळ दिला.CRIME NEWS

१८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर घडलेल्या या प्रकरणात पूर्वीची पोलीस कोठडी संपल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षाने तपास निर्णायक टप्प्यावर असल्याचे सांगत कटाचे अनेक पैलू, डिजिटल पुरावे आणि घटनाक्रमाची पडताळणी करणे बाकी असल्याने पुढील पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करत ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढवली.

सियाचा चेतनला पूर्वनियोजित इशारा
पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासानुसार, केतन अग्रवाल यांना दरीत ढकलण्याच्या काही क्षणांपूर्वी सिया गोयल यांनी चेतन चौधरी यांना पूर्वनियोजित इशारा दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच अग्रवाल खाली पडत असताना त्यांना वाचवता येऊ नये म्हणून गोयल मुद्दाम खाली बसल्याचा आरोपही पोलिसांनी न्यायालयात मांडला.CRIME NEWS

हत्येपूर्वी प्रत्यक्ष सराव
तपासात आणखी एक महत्त्वाचा दावा समोर आला असून, घटनेच्या आदल्या दिवशी पुण्यातील बालेवाडी परिसरातील एका कॅफेमध्ये दोन्ही आरोपींनी हत्येचा कट रचल्याचा संशय आहे. या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात असून त्याची तपासणी सुरू आहे. आरोपींनी हत्येपूर्वी प्रत्यक्ष सराव केला होता का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणात फॉरेन्सिक, डिजिटल आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू असून, येत्या काही दिवसांत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.CRIME NEWS

लोहगडावर पर्यटकांची गर्दी; घटनास्थळाला 'सिया पॉईंट'ची ओळख
पुणे: युवा उद्योजक केतन अगरवाल हत्या प्रकरणानंतर लोहगड किल्ला पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या किल्ल्याविषयी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. परिणामी, घटनास्थळ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पर्यटकांची संख्या २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे.CRIME NEWS

ज्यांना या प्रकरणाची माहिती आहे, ते नेमके केतनला कुठून ढकलण्यात आले, हे ठिकाण पाहण्यासाठी आवर्जून लोहगडावर येत आहेत. स्थानिकांनी या जागेला 'सिया पॉईंट' असे संबोधण्यास सुरुवात केली असून, ही ओळख आता पर्यटकांमध्येही प्रचलित होत आहे.

डार्क टुरिझम'ची वाढ होत आहे
लोहगड हा राज्यातील सर्वाधिक सहज गाठता येणाऱ्या किल्ल्यांपैकी एक मानला जातो. लोहगडवाडीपासून अवघ्या १५ ते २० मिनिटांत किल्ल्यावर पोहोचता येते. पूर्वी मळवली रेल्वे स्थानकापासून पायी जावे लागत होते. मात्र, आता रस्ते आणि वाहतुकीच्या सुविधांमुळे पुणे, मुंबई तसेच परिसरातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे पोहोचत आहेत. समुद्रसपाटीपासून सुमारे १,०१२ मीटर उंचीवर असलेला हा किल्ला पावसाळ्यात विशेष आकर्षण ठरतो.CRIME NEWS

दरम्यान, इतिहास अभ्यासकांनी या वाढत्या प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, लोहगडसह राज्यातील किल्ले हे शौर्य आणि इतिहासाची साक्ष देणारी स्मारके आहेत. मात्र, अलीकडच्या काळात किल्ल्यांवर मनोरंजन, सेलिब्रेशन आणि गुन्हेगारी घटनांशी संबंधित 'डार्क टुरिझम' वाढताना दिसत आहे. शौर्यभूमींचे केवळ पर्यटनस्थळांमध्ये रूपांतर होणे ही चिंतेची बाब असून, किल्ल्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे जतन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

CRIME NEWS

શેર કરો