મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

CRIME NEWS : लिफ्टमध्ये थुंकल्याच्या कारणावरून पती-पत्नीवर चाकूने हल्ला

महिलेस अटक; एका अल्‍पवयीन मुलावरही गुन्हा दाखल

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

CRIME NEWS : लिफ्टमध्ये थुंकल्याच्या कारणावरून पती-पत्नीवर चाकूने हल्ला

महिलेस अटक; एका अल्‍पवयीन मुलावरही गुन्हा दाखल

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : लिफ्टमधील शू रॅकवर थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका जोडप्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना मोरवाडी येथे बुधवारी (१० जून) रोजी रात्री सव्‍वाआठ वाजण्याच्‍या सुमारास घडली.CRIME NEWS

તસવીરો · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

या प्रकरणी जखमी महिलेने संत तुकारामनगर पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीवरून कविता योगेश उभयकर (रा. मोरवाडी, पिंपरी) या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच एका अल्‍पवयीन मुलावरही गुन्हा दाखल केला आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती लिफ्टमधून जात होते. लिफ्टमध्ये कोणीतरी थुंकल्याच्या कारणावरून ते दोघे बोलत असताना अल्पवयीन मुलाने त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलगा आणि आरोपी महिला दोघांनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांच्या पतीवर चाकूने भोकसून वार केले.CRIME NEWS

संत तुकारामनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

CRIME NEWS

શેર કરો