CRIME NEWS : अवैध दारू विक्रीसह वाहतूक प्रकरणी चौघांना अटक
वेगवेगळ्या कारवायांमध्ये गुन्हे दाखल
1 મિનિટ વાંચન

वेगवेगळ्या कारवायांमध्ये गुन्हे दाखल
पिंपरी, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS : दापोडी, चिंचवड, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी आणि पिंपरी परिसरात दारू विक्री, वाहतूक आणि दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चार वेगवेगळ्या कारवाया करत चौघांना अटक केली.CRIME NEWS

कासारवाडी येथे एका सोसायटीच्या पाठीमागील बाजूला दारू विक्री करणाऱ्या बंटुसिंह निर्भससिंह ठाकूर (वय २३, रा.कासारवडी) याला दापोडी पोलिसांनी रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून देशी दारूचा तीन हजार ८४० रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.CRIME NEWS
चिंचवडमधील लिंक रोड येथे चिंचवड पोलिसांनी रविवारी सायंकाळी राहुल रमेश कुरबेट (वय ३३, रा. चिंचवडगाव) याला अटक केली. तो रिक्षा (क्रं. एमएच १४/एलएस ७१२२) मधून दारू विक्रीसाठी घेऊन जात असताना, कारवाई करत १८८० रुपये किमतीची दारू जप्त केली आहे.
दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिके चौक, कुरुळी येथे एका व्यक्तीने नागरिकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. याप्रकरणी पोलिसांनी संतोष नवनाथ खडप (वय २५, कुरुळी, खेड. मूळ रा. लातूर) याला अटक केली.CRIME NEWS
चौथी कारवाई पिंपरी पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील इराणी कॅफेसमोर केली. राजू नसिंह राम (३४, चिंचवड. मूळ रा. राजस्थान) हा अवैधपणे देशी दारूची वाहतूक करत असताना पकडला गेला. त्याच्याकडून चार हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या १०० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
CRIME NEWS
