મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

CRIME NEWS : दारूच्या नशेत पोलिसांशी हुज्जत; सरकारी कामात अडथळा आणणारा तरुण अटक

पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना केली धक्काबुक्की

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

CRIME NEWS : दारूच्या नशेत पोलिसांशी हुज्जत; सरकारी कामात अडथळा आणणारा तरुण अटक

पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना केली धक्काबुक्की

पुणे CRIME NEWS: खडक पोलिस ठाण्यात दारूच्या नशेत पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे २,२० वाजण्याच्या सुमारास खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिस अंमलदार चंद्रशेखर हुणचळगी आणि त्यांचे सहकारी एमडीटी डिव्हाईसवर प्राप्त कॉलची पडताळणी करण्यासाठी गेले असता, आरोपी रोहन गौतम साळवे (वय २६, रा. गुलटेकडी, पुणे) हा एका महिलेशी हॉटेल बंद करण्याच्या कारणावरून वाद घालत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला समजावून खडक पोलिस ठाण्यात आणत असताना, आरोपीने दारूच्या नशेत फिर्यादी तसेच इतर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. तसेच हातापायांनी मारहाण करण्याचा प्रयत्न करत सरकारी कर्तव्यात अडथळा निर्माण केला आणि धमक्याही दिल्या.CRIME NEWS

या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, १२१(१), ३५१(३), ३५२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११२/११७ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.CRIME NEWS

आरोपी रोहन साळवे याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे करीत आहेत.

CRIME NEWS

શેર કરો