મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Crime News : दौंडमध्ये धाडसी घरफोडी; ३.८७ लाखांचा ऐवज लंपास

पुणे, महाराष्ट्र मिरर

મ
મુબારક

1 મિનિટ વાંચન

Crime News

Crime News : रोख रक्कम, सोन्याच्या दागिन्यांसह दुचाकीवर मारला डल्ला; यवत पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे, महाराष्ट्र मिरर

Crime News : दौंड तालुक्यातील वाळकी (पिराचीवाडी) येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत रोख रक्कम, सोन्याचे दागिने, दुचाकी आणि महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण ३ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (crime news daund house burglary)

Sting Drink Ban: शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’ ड्रिंकच्या विक्रीवर बंदी

याबाबत शरद शिवाजी थोरात (वय ४५, रा. वाळकी, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी पहाटे एक ते पावणेदोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी थोरात यांच्या घराचे कुलूप तोडले. (crime news)

हेही वाचा: Crime News : २४ तासांत घरफोडी, अपहरण आणि लाखो रुपयांची चोरी

चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याच्या अंगठ्या, गंठण, फुले, बदाम आणि रोख १ लाख ४० हजार रुपये लंपास केले. याशिवाय घरातील बँकेची पासबुके, एटीएम कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रेही चोरून नेली. चोरट्यांनी एवढ्यावरच न थांबता घराबाहेर उभी केलेली हिरो कंपनीची दुचाकीही (मोटारसायकल) पळवून नेली. (crime news )

Pune Rain : पावसाची संततधार कायम; तरीही पुण्याच्या धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक

सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. फिर्यादी थोरात यांनी तातडीने यवत पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

https://www.instagram.com/p/DaUfzxps_dh

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.

શેર કરો