CRIME NEWS : अरणेश्वर येथे तरुणावर हल्ला; दोघांना अटक, दोघांचा शोध सुरू
धारदार हत्यार, बांबू आणि दगडाने हल्ला करून जखमी केले
1 મિનિટ વાંચન

धारदार हत्यार, बांबू आणि दगडाने हल्ला करून जखमी केले
पुणे CRIME NEWS : अरणेश्वर परिसरात फोनवर बोलत उभ्या असलेल्या १९ वर्षीय तरुणावर धारदार हत्यार, बांबू आणि दगडाने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता दुर्गामाता मंदिर, अरणेश्वर, सहकारनगर येथे ही घटना घडली. फिर्यादी तरुण फोनवर बोलत उभा असताना आरोपी गणेश आनंत काथवटे (वय २६, रा. अरणेश्वर) आणि लखन कांबळे (वय २०, रा. अरणेश्वर) यांच्यासह यश खंडाळे व एका अनोळखी इसमाने त्याच्यावर हल्ला केला.CRIME NEWS :
आरोपींनी धारदार हत्यार, बांबू आणि दगडाच्या साहाय्याने मारहाण केल्याने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS :
सहकारनगर पोलिसांनी गणेश काथवटे आणि लखन कांबळे यांना अटक केली असून फरार आरोपी यश खंडाळे व त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार खोजे करीत आहेत.
CRIME NEWS :
