CRIME NEWS : दारू विक्री प्रकरणी विविध ठिकाणी पोलिसांच्या २३ कारवाया
सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
1 મિનિટ વાંચન

सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी: बेकायदेशीरपणे दारू विक्री केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी बुधवारी (३ जून) एका दिवशी २३ कारवाया केल्या. यामध्ये पोलिसांनी सुमारे दोन लाख रुपयांची दारू पकडली आहे.CRIME NEWS

सांगवी, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी, तळेगाव एमआयडीसी, दापोडी, उत्तर महाळुंगे, पिंपरी, उत्तर चाकण, बावधन, भोसरी एमआयडीसी, वाकड, निगडी, संत तुकाराम नगर आणि चिंचवड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये २८ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी एक लोक ९७ हजार ४४६ रुपये किमतीची दारू पकडली आहे.CRIME NEWS
पिंपरी मधील भाटनगर परिसरात केलेल्या कारवाई मध्ये आरोपीने किचन मध्ये दारूसाठा लपवून ठेवला होता. तो दारूसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. तर चिंचवड मधील दळवीनगर झोपडपट्टी येथे कारवाईसाठी गेलेले पोलीस पाहून दारू विक्री करणारी महिला पोलिसांना पाहून पळून गेली. पळून गेलेल्या महिलेची ओळख पटवून तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
CRIME NEWS
