CRIME NEWS : ओटीपी न सांगताही क्रेडिट कार्डवरून १४ व्यवहार - शोल्डर
सायबर भामट्यांचा एकाला साडेअकरा लाखांचा गंडा
PG
Prashik Ghaste
1 મિનિટ વાંચન

सायबर भामट्यांचा एकाला साडेअकरा लाखांचा गंडा
पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: कोणताही ओटीपी शेअर न करताही एका व्यक्तीच्या क्रेडिट कार्डवरून १४ व्यवहार करून तब्बल ११ लाख ६६ हजार २५२ रुपये परस्पर काढण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी ५४ वर्षीय फिर्यादी त्यांच्या मित्राशी मोबाईलवर बोलत असताना अज्ञात सायबर भामट्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर केला. काही मिनिटांतच सलग १४ व्यवहार करण्यात आले आणि मोठी रक्कम परस्पर वळती करण्यात आली. व्यवहारांची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादींनी पोलिसांत धाव घेतली. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत.
CRIME NEWS
