મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Crime : दृश्यम'लाही मागे टाकणारा थरार! बारामतीत पत्नीचा पतीला जिवंत पुरण्याचा कथित कट उधळला

पुणे crime: बारामतीत उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे.

ધઓ
ધનશ્રી ઓતારી

2 મિનિટ વાંચન

crime

Crime: भरत फोर्जच्या कर्मचाऱ्याला गुंगीचे औषध देऊन क्रिकेट बॅटने मारहाण; घरातच बांधलेल्या सिमेंटच्या कट्ट्यात पुरण्याचा प्रयत्न, ११२ वर आलेल्या गूढ फोनमुळे जीव वाचला

पुणे
crime: बारामतीत उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. अजय देवगणच्या 'दृश्यम' चित्रपटातील कथानकालाही मागे टाकणाऱ्या या घटनेत एका महिलेने आपल्या पतीला ठार मारून घरातच कायमचे पुरून टाकण्याचा कथित कट रचल्याचा आरोप आहे. मात्र, डायल ११२ वर आलेल्या एका अज्ञात फोनमुळे हा थरारक कट उधळला गेला आणि भरत फोर्जमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा जीव वाचला. crime baramati wife tries drishyam style

या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१३/२०२६ अन्वये बीएनएस कलम १०९(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रकाश कान्होबा जगताप (७१), रा. ढाकाळे, ता. बारामती यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांची सून शर्मिला प्रविण जगताप (३८), रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, फ्लॅट क्रमांक ९, जामदार रोड, बारामती हिला आरोपी करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित प्रविण प्रकाश जगताप (४१) हे भरत फोर्जमध्ये कार्यरत असून त्यांचे आणि पत्नीचे सुमारे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना १० वर्षांचा मुलगा आणि ८ वर्षांची मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. crime


फिर्यादीनुसार, ३० जुलै २०२६ रोजी रात्री ११.३० ते १ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० या कालावधीत आरोपीने पतीला जीवे मारण्याचा कट रचला. तिने प्रथम कोणतेतरी गुंगीचे औषध देऊन त्याला अर्धबेशुद्ध केले, त्यानंतर क्रिकेटच्या लाकडी बॅटने मारहाण केली. यावरच न थांबता, घरातील हॉललगतच्या गॅलरीत आधीच बांधून ठेवलेल्या चौकोनी सिमेंटच्या कट्ट्यात बेशुद्ध पतीला झोपवून त्यावर कडप्पा फरशी बसवून तो कायमचा बंद करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.


तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, या कामासाठी बोलावलेल्या मजुरांना आरोपीने सुरुवातीला "माझ्या पतीचा मृत्यू झाला असून त्यांची शेवटची इच्छा घरात समाधी देण्याची होती," असे सांगितले. मात्र, कट्ट्यातून हालचाल होत असल्याचे मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी प्रश्न विचारला असता, तिने लगेच "ते जिवंत समाधी घेणार आहेत," अशी दुसरी कथा सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. crime

Bhumi Green : कचरा प्रक्रिया निविदेत ५०० कोटींचा गैरव्यवहार?


दरम्यान, घरात सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींची माहिती एका अज्ञात व्यक्तीने डायल ११२ वर दिली. माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल रामचंद्र चिवडशेट्टी यांनी सांगितले की, पोलिस घरात पोहोचल्यानंतर आरोपी महिलेने सुरुवातीला "माझे पती पासपोर्टच्या कामासाठी पुण्याला गेले आहेत," असा बनाव केला. मात्र, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी घराची सखोल पाहणी केली.

तपासादरम्यान अर्धवट बंद करण्यात आलेल्या सिमेंटच्या कट्ट्यात प्रविण जगताप बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी तातडीने कट्टा उघडून त्यांना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
प्राथमिक चौकशीत आरोपीने पती आपल्याशी चांगले वागत नव्हते, घरात मोलकरणीसारखी वागणूक देत होते आणि त्यामुळे रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

PMC : १९९० पासूनची भूसंपादन प्रकरणे प्रलंबित ; हजारो कोटींच्या मोबदल्याचा प्रश्न ऐरणीवर


या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळावरून औषधांचे नमुने, क्रिकेट बॅट, बांधकाम साहित्य तसेच इतर महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. फॉरेन्सिक तपास सुरू असून मजूर, नातेवाईक आणि इतर साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगवले करीत असून, गुन्हा पोलीस हवालदार नलावडे यांनी दाखल केला आहे.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

શેર કરો