મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Delhi News : व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ७० रुपयांपर्यंत वाढ; घरगुती गॅसच्या किमती कायम

Delhi News : नवी दिल्ली : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ७० रुपयांपर्यंत वाढ; घरगुती गॅसच्या किमती कायम बँकिंग, पेमेंट नियमांतही बदल; इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या दरवाढीचेही वृत्त
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ७० रुपयांपर्यंत वाढ; घरगुती गॅसच्या किमती कायम बँकिंग, पेमेंट नियमांतही बदल; इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या दरवाढीचेही वृत्त

Delhi News : बँकिंग, पेमेंट नियमांतही बदल; इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या दरवाढीचेही वृत्त

Delhi News : नवी दिल्ली : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १ ऑक्टोबरपासून शहरानुसार ६२.५० ते ७० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे वृत्त आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचा दर ६३.५० रुपयांनी वाढून २,७६४.५० रुपये झाला आहे. मात्र, १४ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत बदल झालेला नाही.https://maharashtramirror.com Delhi News :
दिल्लीतील व्यावसायिक सिलिंडरचा दर २,७४७.५० रुपयांवरून २,८१० रुपये झाला आहे. कोलकात्यात ७० रुपयांच्या वाढीनंतर दर २,९५४ रुपये, तर चेन्नईत ६६.५० रुपयांच्या वाढीनंतर २,९८३ रुपये झाला आहे. https://maharashtramirror.com/ Delhi News

एलपीजी अनुदानासाठी ई-केवायसी

दिलेल्या वृत्तानुसार, अनुदानित दरात एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून बायोमेट्रिक आधार पडताळणी अर्थात ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. ती आधीच पूर्ण केलेल्या ग्राहकांसाठी बदल नसेल.
पडताळणी न केलेल्या ग्राहकांचे सिलिंडर बुकिंग किंवा पुरवठा बंद होणार नाही; मात्र त्यांना अनुदानित दराचा लाभ मिळणार नाही. ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर हा लाभ पुन्हा मिळेल, असे वृत्तात नमूद आहे.

निवडक व्यापारी यूपीआय व्यवहारांवर शुल्क

१५ ऑक्टोबरपासून दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या निवडक व्यापारी यूपीआय व्यवहारांवर व्यापारी सवलत दर अर्थात ‘एमडीआर’ लागू होणार असल्याचे वृत्तात म्हटले आहे. महिन्याला यूपीआयद्वारे एक लाख रुपयांपर्यंत रक्कम स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्यांचे व्यवहार विनामूल्य राहतील.
सलग तीन महिने एक लाख रुपयांपेक्षा अधिक यूपीआय रक्कम स्वीकारणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांचा बँकांकडून मोठ्या व्यापाऱ्यांच्या श्रेणीत समावेश केला जाईल आणि शुल्क लागू होईल, असेही नमूद आहे. व्यक्ती-व्यक्तींमधील व्यवहार विनामूल्य राहतील.

एसबीआयच्या पगार खात्यांसाठी व्यवहारमर्यादा

एसबीआयच्या पगार खातेदारांना अन्य बँकांच्या एटीएम किंवा पैसे जमा व काढण्याच्या यंत्रांवर महिन्याला पाच मोफत व्यवहार करता येतील, असे वृत्तात म्हटले आहे. यापूर्वी ही मर्यादा दहा व्यवहारांची होती. शिल्लक तपासणे आणि पैसे काढणे या दोन्हींचा त्यात समावेश आहे. मोफत मर्यादेनंतर प्रत्येक व्यवहारासाठी १५ रुपये आणि जीएसटी आकारला जाईल.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्याही दरात वाढ

एसी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रिजच्या किमतींमध्ये तीन ते आठ टक्क्यांपर्यंत वाढ होत असल्याचेही वृत्त आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि चलनातील चढ-उतार ही त्यामागील कारणे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

विक्रेते आणि वितरकांकडे जुन्या दराने खरेदी केलेला एक ते दीड महिन्यांचा साठा असल्याने काही उपकरणे दिवाळीपर्यंत जुन्या दरात उपलब्ध राहू शकतात, असे वृत्तात म्हटले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો