મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Delhi News: कॉकरोच जनता पार्टी नवी दिल्लीत मोर्चा काढणार

Delhi News :नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीने केंद्र सरकारविरोधात दि.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

कॉकरोच जनता पार्टी नवी दिल्लीत मोर्चा काढणार
कॉकरोच जनता पार्टी नवी दिल्लीत मोर्चा काढणार

Delhi News :नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीने केंद्र सरकारविरोधात दि. ५ सप्टेंबरला नवी दिल्लीत शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. २५ जुलै रोजी तरुणांना दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केली नसल्याचा आरोप सीजेपीकडून करण्यात आला आहे.हा मोर्चा इंडिया गेटपासून सुरू होऊन नवी दिल्ली पोलिस मुख्यालयाच्या दिशेने जाणार आहे. या आंदोलनात देशभरातील विद्यार्थी, युवा संघटना आणि तरुण नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. तरुणांच्या मागण्यांवर सरकारने ठोस पावलं उचलावीत, अशी मागणी सीजेपीकडून करण्यात आली आहे. https://maharashtramirror.com/ Delhi News
२५ जुलैला झालेल्या आंदोलनानंतर सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांचं आंदोलनं मागे घेण्यात आलं होतं. मात्र, सरकारने दिलेली आश्वासने अद्यापही पूर्ण झाली नसल्याचा दावा CJPने केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सीजेपीकडून सांगण्यात आलं आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News

શેર કરો