Dimapur News : चिन्मय सुतार नाबाद 400! मुंबईकर रणजीपटू लारा, ब्रॅडमन यांच्या पंक्तीत, मिझोरमकडून नागालँड विरुद्ध खेळताना इतिहास रचला
Dimapur News :दिमापूर, नागालँड : रणजी करंडकाच्या इतिहासात तब्बल 78 वर्षांनी एक विक्रमी खेळी पाहायला मिळाली.
1 મિનિટ વાંચન

Dimapur News :दिमापूर, नागालँड : रणजी करंडकाच्या इतिहासात तब्बल 78 वर्षांनी एक विक्रमी खेळी पाहायला मिळाली. मूळचा मुंबईकर आणि सध्या मिझोरमकडून खेळणाऱ्या चिन्मय सुतारनं रणजी करंडक स्पर्धेत ही ऐतिहासिक कामगिरी केलीय. चिन्मयनं नागालँडविरूद्धच्या सामन्यात पहिल्या डावात नाबाद 400 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर मिझोरमनं आपला पहिला डाव 9 बाद 581 धावांवर घोषित केला.https://maharashtramirror.com/ Dimapur News
नागालँडच्या दिमापूरमध्ये सुरू असलेल्या असलेल्या या सामन्यात चिन्मयनं 517 चेंडू खेळताना 46 चौकार आणि 7षटकारांसह नाबाद 400 धावा केल्या. रणजीच्या आजवरच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो दुसराच फलंदाज ठरलाय. तर प्रथमश्रेणी क्रिकेटमधला नववा फलंदाज ठरलाय. 517 चेंडू खेळताना त्यानं 46 चौकार आणि 7 षटकारांसह ही विक्रमी खेळी उभारली.
लारा, ब्रॅममन यांच्या पंक्तीत सुतार
1948 च्या रणजी मोसमात महाराष्ट्राच्या भाऊसाहेब निंबाळकरांनी एका डावात 443 धावा केल्या होत्या. त्यानंतर या स्पर्धेत 400 धावांचा टप्पा गाठणारा चिन्मय सुतार दुसराच खेळाडू ठरलाय. तर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्येही त्यानं आता सर डॉन ब्रॅडमन, ब्रायन लारा यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवलंय. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम लाराच्या नावावर आहे. त्यानं कौंटी क्रिकेटमध्ये 1994 साली 501 धावा फटकावल्या होत्या. लाराचा हा विक्रम आजही अबाधित आहे.
वडिलांकडून मिळाला क्रिकेटचा वारसा
चिन्मयला क्रिकेटचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. त्याचे वडील राजेश सुतार हे मुंबई क्रिकेटमधील मोठे नाव असून ते मुंबईकडून रणजी क्रिकेट खेळले आहेत आणि नामांकित प्रशिक्षकही आहेत. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या चिन्मयने आतापर्यंत क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI), टाटा स्पोर्ट्स क्लब आणि मुंबई कस्टम्स अशा नामांकित संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. मुंबई टी20 लीगमध्येही गेल्या दोन मोसमात विजेता ठरलेल्या मराठा रॉयल्स संघाचा तो महत्त्वाचा खेळाडू आहे. चिन्मयनं मुंबईकडून याआधी विजय हजारे करंडकात प्रतिनिधित्व केलं होतं.
