CrimeNews: चिंचवड येथे अवैध देशी दारू विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा
Crime News पिंपरी: रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे देशी दारू विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी पकडले.
વક
વિક્રાંત કુલકર્ણી
1 મિનિટ વાંચન

CrimeNews : संशयिताने ८०० रुपये किमतीची देशी दारू बेकायदेशीरपणे विक्रीसाठी जवळ बाळगली
Crime News पिंपरी: रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे देशी दारू विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी पकडले. ही कारवाई रविवारी (३० ऑगस्ट) दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास जय मल्हार हॉटेलजवळ, चिंचवड येथे करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Crime News
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाचकर यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी अनिल रामकृष्ण कालुगडे (२७, रा. चिंचवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून नोटीस देण्यात आली आहे. आरोपीने खाकी रंगाच्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ८०० रुपये किमतीची देशी दारू बेकायदेशीरपणे विक्रीसाठी जवळ बाळगली होती. गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
