મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

पुणे मुबंई एक्सप्रेस वे जवळ हातभट्टी दारूचे रसायन जप्त

कारवाईत सुमारे १,५०० लिटर रसायन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ५२ हजार ५०० रुपये आहे

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

पुणे मुबंई एक्सप्रेस वे जवळ हातभट्टी दारूचे रसायन जप्त

कारवाईत सुमारे १,५०० लिटर रसायन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ५२ हजार ५०० रुपये आहे

पुणे: एक्सप्रेस वे लगतच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीररीत्या हातभट्टीची दारू तयार करण्याचे रसायन बाळगणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई रविवारी (१२ एप्रिल) दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुंबई एक्सप्रेस हायवे जवळील गोल्डसाईन मीडिया होर्डिंगच्या खाली घडली.

या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष गुरव यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मलिका वजीर राठोड (२८, शिरगाव, मावळ) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला कोणत्याही परवान्याशिवाय हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या कारवाईत सुमारे १५०० लिटर रसायन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ५२ हजार ५०० रुपये आहे. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.

Chemicals for hand-made liquor seized near Pune Mumbai Expressway

શેર કરો