મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai News : चला शाळेत जाऊया’ अभियानातून राज्यातील प्रत्येक शाळेत गुणवत्तापूर्ण बदल घडेल*-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

Mumbai News : मुंबई, महाराष्ट्र मिरर: राज्यातील प्रत्येक शाळेत मूलभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळांमध्ये भेट देऊन काम करावे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

'चला शाळेत जाऊया’ अभियानातून राज्यातील प्रत्येक शाळेत गुणवत्तापूर्ण बदल घडेल* -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
'चला शाळेत जाऊया’ अभियानातून राज्यातील प्रत्येक शाळेत गुणवत्तापूर्ण बदल घडेल* -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

Mumbai News : मुंबई, महाराष्ट्र मिरर: राज्यातील प्रत्येक शाळेत मूलभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळांमध्ये भेट देऊन काम करावे. कामाचे प्रतिबिंब शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये दिसले पाहिजे. यासाठी राज्यभर ‘चला शाळेत जाऊया’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे ‘ज्ञानमंदिरांचे सशक्तीकरण’ ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.https://maharashtramirror.com/ Mumbai News

मुंबईतील बालभवन येथे आयोजित शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ‘शिक्षण संवाद’ या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्यासह विभागातील सर्व संचालक, उपसंचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.https://maharashtramirror.com/ Mumbai News

मंत्री दादाजी भुसे म्हणाले, राज्यातील आठही विभागांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हानिहाय जबाबदारी निश्चित करून प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र आढावा घेण्यात येणार आहे. हे अधिकारी चार दिवसांच्या विशेष दौऱ्यात शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचे मूल्यांकन करतील. सकारात्मक बदल दिसून येणाऱ्या शाळांना विविध माध्यमांतून प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.https://maharashtramirror.com/ Mumbai News

शाळांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही मंत्री भुसे यांनी दिली. तसेच, राज्य सरकारने शिक्षण क्षेत्राला प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, जिल्हा नियोजन समिती निधी, विविध विकास योजना तसेच कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीच्या माध्यमातून शाळांच्या विकासासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.https://maharashtramirror.com/ Mumbai News

बालवाटिका ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन आणि गणितातील मूलभूत कौशल्ये भक्कम करण्यावर भर द्यावा. पोषण आहार, शालेय गणवेश आणि विद्यार्थ्यांच्या सुविधांबाबत तडजोड खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत मंत्री भुसे यांनी निकृष्ट दर्जाचा पुरवठा किंवा अनियमितता आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.https://maharashtramirror.com/ Mumbai News

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, एनसीसी, स्काऊट-गाईड, योग, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. शिक्षण क्षेत्रात लोकचळवळ उभी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.https://maharashtramirror.com/ Mumbai News

यावेळी प्रधान सचिव देओल यांनी शाळा भेटीसाठी जाताना सर्व अधिकाऱ्यांनी अधिकाधिक शाळांना भेट देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना केली. आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी विद्यार्थी शाळेतून बाहेर पडल्यानंतर सक्षम झाला पाहिजे, सक्षमीकरणासाठी स्थानिक पातळीवरील विविध विभागांच्या निधीसाठी विभागातील अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याची सूचना केली. यावेळी उपस्थित शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक तसेच विभागातील अधिकाऱ्यांनी आपले अनुभव कथन करून शाळांमध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी उपयुक्त सूचना केल्या.

શેર કરો