મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : अंधांच्या बुद्धिबळ स्पर्धेत गौरव फुलसुंदर आघाडीवर

Pune News :आळंदी : अंधांसाठी आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरशालेय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या फेरीअखेर तारामती बाफना विद्यालय, संभाजीनगरचा गौरव फुलसुंदर याने ६ गुणांसह आघाडी घेतली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

अंधांच्या बुद्धिबळ स्पर्धेत गौरव फुलसुंदर आघाडीवर
अंधांच्या बुद्धिबळ स्पर्धेत गौरव फुलसुंदर आघाडीवर

Pune News : सहाव्या फेरीअखेर ६ गुणांसह अव्वल स्थान; राज्यभरातील अंधशाळांमधील १०६ स्पर्धकांचा सहभाग

Pune News :आळंदी : अंधांसाठी आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरशालेय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या फेरीअखेर तारामती बाफना विद्यालय, संभाजीनगरचा गौरव फुलसुंदर याने ६ गुणांसह आघाडी घेतली आहे. आळंदी देवाची येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात सुरू असलेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील अंधशाळांमधून १०६ स्पर्धक सहभागी झाले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

स्वामी विवेकानंद जीवन ज्योत संस्था, पुणे आणि ऑल मराठी चेस असोसिएशन फॉर द व्हिज्युअली चॅलेंज्ड यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड यांच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी चौथी, पाचवी आणि सहावी फेरी खेळविण्यात आली. स्पर्धकांसाठी आयोजकांनी निवास आणि भोजनाची व्यवस्था विनामूल्य केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

सहाव्या फेरीत पहिल्या पटावर गौरव फुलसुंदरने ज्ञानज्योती विद्यालय, नागपूरच्या ज्ञानेश्वर भोंग याला पराभूत करून ६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. भोसरीच्या बर्वेश लुटेने बाबासाहेब वागमारे याच्यावर विजय मिळवत ५.५ गुणांची कमाई केली. भोसरीच्या प्रणव जयभायने चिखलदरा, अमरावतीच्या आकाश वाघमारेवर मात करून ५ गुण मिळवले.

गुरु गोबिंद, नांदेडच्या अर्चना तामवाडने कृष्णा शिंदेवर विजय मिळवत ५ गुण नोंदवले. पीएसएचबी, पुणेच्या साईनाथ काकडेने तारामती बाफना विद्यालयाच्या बद्री दौंडला पराभूत केले. तारामती बाफना विद्यालयाच्या चैतन्य वाघने साई नेमाणेवर मात करत ५ गुण मिळवले.

हेलन केलर, नांदेडच्या शिवानी कापतेने पीएसएचबी पुणेच्या ईश्वर कालगुडेवर, तर विशाल चव्हाणने जयेश मोरेवर विजय मिळवला. वैभव कांबळेने चाळीसगावच्या अक्षय जाधवला पराभूत करत ५ गुण मिळवले. अस्मिता जाधवने जागृती, आळंदीच्या नम्रता भारसाकलेवर विजय मिळवत आपली गुणसंख्या ४.५ वर नेली. स्पर्धेचा आणखी एक दिवस बाकी असून पुढील फेऱ्यांतील निकालानंतर अंतिम विजेत्याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો