મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai news : कोट्यवधींच्या संपत्तीचा आमदार भिकाऱ्याच्या वेशात; पराग शाह यांचा व्हिडिओ व्हायरल, नेमकं कारण काय?

Mumbai news मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेतील सर्वात श्रीमंत आमदार म्हणून ओळखले जाणारे भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

कोट्यवधींच्या संपत्तीचा आमदार भिकाऱ्याच्या वेशात; पराग शाह यांचा व्हिडिओ व्हायरल, नेमकं कारण काय?
कोट्यवधींच्या संपत्तीचा आमदार भिकाऱ्याच्या वेशात; पराग शाह यांचा व्हिडिओ व्हायरल, नेमकं कारण काय?

Mumbai news मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेतील सर्वात श्रीमंत आमदार म्हणून ओळखले जाणारे भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये ते चक्क भिकाऱ्याच्या वेशात रस्त्यावर फिरताना आणि लोकांकडे भीक मागताना दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, पराग शाह यांनी हा वेश का धारण केला, यामागचं कारण आता समोर आलं आहे.https://maharashtramirror.com/wp-admin/post.php?post=52954&action=edit Mumbai news

आत्मपरीक्षणासाठी गुरुंचा सल्ला


पराग शाह यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तब्बल 3,383 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जाहीर केली होती. त्यामुळे त्यांची श्रीमंत आमदार म्हणून देशभरात चर्चा झाली होती.https://maharashtramirror.com/ Mumbai news

मात्र, याच कोट्यवधींच्या संपत्तीपासून काही काळ दूर राहत त्यांनी एका वेगळ्या अनुभवाचा स्वीकार केला. जैन धर्मीयांसाठी महत्त्वाच्या असलेल्या चातुर्मासाच्या काळात, पराग शाह यांचे गुरु नम्रमुनी यांनी त्यांना एक दिवस भिकाऱ्याप्रमाणे जीवन जगण्याचा अनुभव घेण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

गुरुंच्या या सल्ल्यानुसार पराग शाह यांनी आपली सुरक्षा व्यवस्था, आलिशान गाड्या आणि महागड्या वस्तू बाजूला ठेवल्या. त्यानंतर त्यांनी भिकाऱ्याचा वेश धारण करून काही तास घाटकोपरच्या रस्त्यांवर फिरत सामान्य लोकांकडून भीक मागितली.

लोकांकडून मिळालेलं अन्नही खाल्लं


भिकाऱ्याच्या वेशात असताना पराग शाह यांनी रस्त्यावर लोकांशी संवाद साधला. काही लोकांनी त्यांना अन्न दिलं, ते त्यांनी स्वीकारलं आणि खाल्लं. काही काळ त्यांनी रस्त्याच्या कडेला बसून गरिबीचं आणि भिकाऱ्याच्या जीवनाचं वास्तव अनुभवण्याचा प्रयत्न केला.

विशेष म्हणजे, त्यांच्या वेशामुळे अनेकांना ते आमदार पराग शाह असल्याची कल्पनाही आली नाही. त्यामुळे हा अनुभव त्यांच्यासाठी आणखी वेगळा ठरला.

मेकअप काढल्यानंतर पुन्हा त्याच लोकांना भेटले


या प्रयोगाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे, भिकाऱ्याच्या वेशातील अनुभव घेतल्यानंतर पराग शाह यांनी आपला मेकअप काढला आणि त्याच परिसरात पुन्हा भेट दिली. ज्या लोकांशी त्यांनी भिकाऱ्याच्या रूपात संवाद साधला होता, त्यांच्याशी त्यांनी पुन्हा चर्चा केली.

या संपूर्ण अनुभवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पराग शाह यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे दिसणाऱ्या या व्हिडिओमुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

गरिबीचं जीवन जवळून अनुभवण्याचा प्रयत्न


पराग शाह यांनी हा संपूर्ण अनुभव आपल्या गुरुंसमोर तसेच इतरांसमोर मांडल्याचं सांगितलं जात आहे. आत्मपरीक्षण करणे, अहंकारापासून दूर जाणे आणि गरिबीचं जीवन प्रत्यक्ष अनुभवणे, हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे.

कोट्यवधींची संपत्ती असलेला एक लोकप्रतिनिधी काही तासांसाठी आपली ओळख आणि सुखसोयी बाजूला ठेवून सामान्य भिकाऱ्याचं जीवन जगतो, ही बाब सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी महाराष्ट्र मिरर इ पेपर वाचा https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો