મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pimpari Crime: भुगाव येथे जमीन विक्रीच्या बहाण्याने ६० लाखांची फसवणूक

Pimpari Crime:: पिंपरी: चाळीस गुंठे जमीन विक्रीस असल्याचे भासवून तब्बल ८० लाख रुपये उकळत त्यातील ६० लाखांची रक्कम परत न देता फसवणूक केली.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

भुगाव येथे जमीन विक्रीच्या बहाण्याने ६० लाखांची फसवणूक जमीन विक्रीस असल्याचे भासवून तब्बल ८० लाख रुपये उकळले
भुगाव येथे जमीन विक्रीच्या बहाण्याने ६० लाखांची फसवणूक जमीन विक्रीस असल्याचे भासवून तब्बल ८० लाख रुपये उकळले

Pimpari Crime: जमीन विक्रीस असल्याचे भासवून तब्बल ८० लाख रुपये उकळले

Pimpari Crime:: पिंपरी: चाळीस गुंठे जमीन विक्रीस असल्याचे भासवून तब्बल ८० लाख रुपये उकळत त्यातील ६० लाखांची रक्कम परत न देता फसवणूक केली. ही घटना १२ डिसेंबर २०२१ पासून १७ सप्टेंबर २०२६ पर्यंत भुगाव येथे घडली.https://maharashtramirror.com/ Pimpari Crime
सुधीर रमेश बराटे (४२, बावधन), सचिन जोरी (४०, रा. ता. मुळशी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अरविंद अनिल माळी (४४, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी यांना ४० गुंठे जमीन विक्रीस असल्याचे सांगून वेगवेगळी खोटी कागदपत्रे दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून ऑनलाइन स्वरूपात ८० लाख रुपये घेतले; मात्र जमीन विकली नाही. त्यानंतर फिर्यादीने पैशांसाठी तगादा लावला असता १९ लाख ९९ हजार रुपये परत केले आणि उर्वरित ६० लाख १ हजार रुपये परत न देता आर्थिक फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करत आहेत. Pimpari Crime https://maharashtramirror.com/

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો