Pune News : भोसरीत पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक
Pune News :पिंपरी: विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले.
વક
વિક્રાંત કુલકર્ણી
1 મિનિટ વાંચન

Pune News :पिंपरी: विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई ३ नोव्हेंबर रोजी रात्री बीआरटी बस स्टॉप, भोसरी येथे करण्यात आली. नागेश्वर उर्फ नागेश महेंद्र पावरा (२१, वडगाव शेरी, मुळ ता. शिरपूर, जिल्हा धुळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महादेव गारोळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीकडे ३० हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे बेकायदेशीररीत्या बाळगलेले आढळले. पोलिसांनी शस्त्र जप्त करत आरोपी नागेश्वर याला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
