મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Bhiwandi Crime News : भिवंडीमध्ये मर्डर ; दगडाने तोंड ठेचून खून

•भिवंडीच्या टेमघरपाडा मधील धक्कादायक घटना, दगडाने तोंड ठेचून जीवेठार मारले

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

Bhiwandi Crime News

•भिवंडीच्या टेमघरपाडा मधील धक्कादायक घटना, दगडाने तोंड ठेचून जीवेठार मारले

भिवंडी :- टेमघरपाडा मधील साईबाबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या जंगलामधे दगडाने तोंड ठेचून ठार मारल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये दगडाने ठेचून जीवे ठार मारलेल्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव आकलेश जयसिंग चौहान (36 वर्ष) मुंबईच्या प्रेमनगर परिसरात राहणारा होता. यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून तोंडावर दगडाने ठार मारण्याची घटना घडली आहे.

भिवंडीच्या शांतीनगर पोलीस ठाणे येथे मयत व्यक्तीच्या भाऊ निलेश जयसिंग चौहान (31 वर्ष) घडलेल्या घटनेबाबत फिर्यादी देत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निलेश याच्या फिर्यादीवरून शांतीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अडूरकर करत आहे. पोलिसांच्या तपासावरून हा खुन कोणत्या कारणामुळे झाला आहे याबाबत अजूनही अस्पष्टता असून लवकरच पोलीस गुन्हेगाराला गजाआड करेल आणि आरोपीला 302 प्रमाणे शिक्षा देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: Maharashtra 3rd Phase Voting: महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान सुरू, सकाळी 11 वाजेपर्यंत किती मतदान?

શેર કરો