મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime : भिमा नदीत तरूणाचा कुजलेला मृतदेह आढळला

पुणे, महाराष्ट्र मिरर : शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरूर तालुक्यातील मौजे भिमा टाकळी येथे भिमा नदीच्या पात्रात एका ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात तरुणाचा साचलेल्या पाण्यात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

भिमा नदीत तरूणाचा कुजलेला मृतदेह आढळला शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
भिमा नदीत तरूणाचा कुजलेला मृतदेह आढळला शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime : शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे, महाराष्ट्र मिरर : शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरूर तालुक्यातील मौजे भिमा टाकळी येथे भिमा नदीच्या पात्रात एका ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात तरुणाचा साचलेल्या पाण्यात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली, तरी हा घातपात असल्याचा वैदकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे .https://maharashtramirror.com/ Pune crime

पोलीस पाटील प्रकाश कर्पे यांनी याबाबत पोलिसांना खबर दिली.दरम्यान, वैद्यकीय तपासणीत सदर तरुणाचा मृत्यू घातपाताने झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime

शिक्रापूर पोलीस ठाण्याचे अंमलदार पुरोहित वाडा, हरिप्रसाद पुरोहित यांच्या शेताजवळ भिमा नदीच्या पात्राकडे ३० ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या पूर्वी तपासणीसाठी गेले होते. तेथे त्यांना पाण्यामध्ये एक अज्ञात इसमाचा मृतदेह तरंगताना दिसून आला. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला असता, त्या मृतदेहाचे दोन्ही पाय, गुडघे आणि मान नायलॉनच्या दोरीने घट्ट बांधलेली असल्याचे निदर्शनास आले. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला.https://maharashtramirror.com/ Pune Crime

डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालात सदर व्यक्तीचा मृत्यू संशयास्पद म्हणजेच ‘हॉमिसाइडल डेथ’ असल्याचे स्पष्ट केले. अज्ञात आरोपीने या तरुणाचा निर्घृण खून केला आणि हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचे हात-पाय व मान बांधून मृतदेह भिमा नदीच्या पात्रात फेकून दिला असावा, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. पोलीस हवालदार हनुमंत बाबासाहेब गिरमकर यांनी दिलेल्या िफर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

શેર કરો