મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime : ट्रकला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Pune Crime पुणे, महाराष्ट्र मिरर: बेदरकारपणे दुचाकी चालवून ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना बावधनमधील मुंबई-बेंगलोर हायवे रोडवरील सीएनजी पंपाजवळ घडली.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

ट्रकला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
ट्रकला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime पुणे, महाराष्ट्र मिरर: बेदरकारपणे दुचाकी चालवून ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना बावधनमधील मुंबई-बेंगलोर हायवे रोडवरील सीएनजी पंपाजवळ घडली. याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.फराहन झाकिरहुसेन शेख (वय २२, रा. मलकापूर, कराड, सातारा) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अथर्व पद्माकर देशमाने (वय २३, रा. भुसारी कॉलनी, कोथरूड, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली.https://maharashtramirror.com/Pune Crime

फराहन शेख शनिवारी (दि. ५) हा आपल्या ताब्यातील दुचाकीवरून मित्र अथर्व कुलकर्णी याला पाठीमागे बसवून मुंबई-बेंगलोर हायवे जात होता. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे दुचाकी चालवत पुढे चाललेल्या ट्रकला उजव्या बाजूने ओव्हरटेक करताना त्याची दुचाकी दुभाजकाला घासून ट्रकला धडकली. यामुळे दुचाकी घसरत जाऊन मोठा अपघात झाला, ज्यामध्ये फराहन गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. बावधन पोलीस तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune crime

શેર કરો