મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Baramati crime : खांडज येथे ७५ वर्षीय वृद्धेची सोन्याची पोत लंपास; तोंड दाबून दुखापत करणारे दोन अज्ञात चोरटे पसार

Baramati crime : बारामती : घरात घुसून ७५ वर्षीय वृद्धेचे तोंड दाबून तिला दुखापत करत गळ्यातील सुमारे ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना खांडज (ता.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

: खांडज येथे ७५ वर्षीय वृद्धेची सोन्याची पोत लंपास; तोंड दाबून दुखापत करणारे दोन अज्ञात चोरटे पसार
: खांडज येथे ७५ वर्षीय वृद्धेची सोन्याची पोत लंपास; तोंड दाबून दुखापत करणारे दोन अज्ञात चोरटे पसार


Baramati crime : बारामती : घरात घुसून ७५ वर्षीय वृद्धेचे तोंड दाबून तिला दुखापत करत गळ्यातील सुमारे ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना खांडज (ता. बारामती) येथे घडली. ही घटना सोमवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास सुमारास घडली.https://maharashtramirror.com/ Baramati crime

तोंड दाबून केली जबरी चोरी


कावेरीबाई जिजाबा आटोळे (वय ७५, रा. खांडज, ता. बारामती) या घरात झोपलेल्या असताना दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराची आतून लावलेली कडी साहित्याच्या सहाय्याने उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर एका चोरट्याने कावेरीबाई यांचे तोंड दाबून त्यांना दुखापत केली. तसेच आरडाओरडा करू नये, यासाठी त्यांच्या तोंडात हाताची बोटे घातली.https://maharashtramirror.com/ Baramati crime

दरम्यान, दुसऱ्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे एक तोळा वजनाची सोन्याची पोत तोडून घेतली. त्यानंतर दोन्ही चोरटे घटनास्थळावरून पसार झाले.

चेहऱ्यावर काळा कपडा
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही चोरट्यांनी चेहऱ्यावर काळा कपडा बांधला होता. त्यापैकी एक चोरटा सडपातळ, तर दुसरा जाड अंगाचा होता. दोघांचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.

या प्रकरणी कावेरीबाई आटोळे यांच्या तक्रारीवरून माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मोहिते पुढील तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો