મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Balasaheb Chandere : बाळासाहेब चांदेरें सह एकावर गुन्हा दाखल; जमिनीच्या वादातून गोळीबार

Balasaheb Chandere पिंपरी, महाराष्ट्र मिरर : शिवसेना नेते बाळासाहेब चांदेरे ( Balasaheb Chandere ) यांच्यासह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

મ
મુબારક

1 મિનિટ વાંચન

balasaheb chandere filed case pune

Balasaheb Chandere : शिवसेना नेते बाळासाहेब चांदेरे यांच्यासह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Balasaheb Chandere
पिंपरी, महाराष्ट्र मिरर : शिवसेना नेते बाळासाहेब चांदेरे (Balasaheb Chandere) यांच्यासह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून वादातून दोन गटात झालेल्या भांडणानंतर हवेत गोळीबार केल्याची घटना सुसगावात घडली आहे. याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.(balasaheb chandere filed case pune)

बाळासाहेब चांदेरे (रा. सुसगाव), संदेश माने (रा. कात्रज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कॅब चालक नागेश राठोड (वय २१, रा. नऱ्हे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

Crime News : ‘चाकण भागात व्यवसाय करायचा असेल तर पैसे दे नाहीतर तुला खल्लास करतो’

फिर्यादी नागेश राठोड आणि त्यांचे मित्र राहुल सरकार व मेहबूब शेख हे २ जुलै रोजी मध्यरात्री सुस-नांदे रोडवरील ओम पराडाईस बिल्डिंगसमोरील बांधकाम साईटवर थांबले होते.

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla : पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल

तिथे राहुल सरकार आणि आरोपी बाळासाहेब चांदेरे यांच्यात बांधकाम साईटच्या जागेच्या मालकीवरून वाद झाला. त्यांनी राहुलला चापट मारली. वाद वाढल्यानंतर बाळासाहेब चांदेरे यांनी आपल्या जवळील काळ्या रंगाचे पिस्तूल काढून जमिनीच्या दिशेने एक राऊंड फायर केला. (Balasaheb Chandere)

गोळीबाराच्या आवाजामुळे घाबरून फिर्यादी णिण त्यांचे मित्र तेथून पळून गेले आणि त्यांनी ‘डायल ११२’ वर पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनतर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक बालजीसिंग ठाकूर पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा: Shivsena : पुण्यात ठाकरे गटाला वाचवण्यासाठी वसंत मोरे 'सरसावले'!

શેર કરો