મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

ATS Raid : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ATS ची छापेमारी

पुणे महाराष्ट्र मिरर

ધઓ
ધનશ્રી ઓતારી

2 મિનિટ વાંચન

ATS Raid

ATS Raid : पाकिस्तानशी संबंधित संशयित नेटवर्कवर ६५ ठिकाणी छापे

पुणे महाराष्ट्र मिरर

ATS Raid : पाकिस्तानशी संबंधित गँगस्टर शहाजान भट्टी याच्या संशयित नेटवर्कचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मंगळवारी पुण्यात मोठी धडक कारवाई केली. शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील तब्बल ६५ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, खळबळ उडाली आहे. ( ATS Raid Pune Pimpri Chinchwad shahjan bhatti )

शिक्रापूर, येरवडा, पिंपरी-चिंचवड आणि आसपासचा परिसरात छापेमारी करत मोबाईल फोन, लॅपटॉप, डिजिटल उपकरणे आणि काही संशयास्पद कागदपत्रे असा मुद्देमार जप्त केला आहे. एनआयए (NIA) आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने ही कारवाई संयुक्त केली आहे. ( ATS Raid)

sunetra pawar : सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाजान भट्टीचे आर्थिक व्यवहार, सोशल मीडियावरील संशयास्पद संपर्क आणि देशाविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या नेटवर्कचा पर्दाफाश करणे, हा या छापेमारीचा मुख्य उद्देश आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे सध्या कसून चौकशी सुरू असून, जप्त केलेल्या डिजिटल उपकरणांमधून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे. ( ATS Raid)

या कारवाईमुळे पुणे परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, नेमके किती जणांना ताब्यात घेतले आहे किंवा कोणावर गुन्हे दाखल होणार आहेत, याबाबत तपास यंत्रणांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. पुढील काही तासांत या कारवाईबाबत सविस्तर अहवाल प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. ( ATS Raid)

Pune Civic : पुण्यासाठी निघालेले नाशिकचे प्रविण पाटील बेपत्ता; मुंबई नाका पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद

पोलिसांच्या 'स्पेशल सेल'ने काही दिवसांपूर्वी, शहजाद भट्टीशी संबंधित कथित दोन गट उद्ध्वस्त करून दिल्ली आणि पंजाबमधून सहा संशयित कार्यकर्त्यांना अटक केली होती. तर चार दिवसांपूर्वी, महाराष्ट्र एटीएसच्या विशेष पथकांनी मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा, बीड, जालना, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण राज्यभरातील १५० हून अधिक संशयास्पद ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून व्यापक शोधमोहीम सुरू केली होती. ( ATS Raid)

MahaRERA: ताबा देण्यास विलंब केल्याप्रकरणी बिल्डरला व्याजाचा फटका

या कारवाईचा मुख्य रोख पाकिस्तानातील लाहोरचा मूळ रहिवासी असलेल्या शहजाद भट्टी याच्या डिजिटल नेटवर्कवर आहे. शहजाद भट्टी हा पूर्वी ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून सोशल मीडियावर सक्रिय होता, मात्र आता तो दुबईत बसून गुन्हेगारी टोळ्यांचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क चालवत असल्याचे उघड झाले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा गैरवापर करून असुरक्षित भारतीय तरुणांना पैशांचे आमिष दाखवून जाळ्यात ओढणे आणि त्यांच्यात कट्टरतावादी विचारसरणी रुजवून त्यांना दहशतवादी कारवायांकडे वळवणे, असा अत्यंत गंभीर आरोप त्याच्यावर आहे. ( ATS Raid)

यावेळी या कारवाईअंतर्गत मराठवाडा विभागामध्ये एकूण १३ महत्त्वाच्या ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक कारवाया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाल्या असून, येथून ९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, जालना जिल्ह्यातून २, धाराशिवमधून १ आणि बीड जिल्ह्यातून १ अशा एकूण १३ जणांना एटीएसच्या पथकाने ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी चौकशीसाठी हलवण्यात आले आहे. ( ATS Raid)

राजस्थान सीमेवरील संशयास्पद हालचालींमुळे कारवाई:
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील मिसरवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आलेल्या एका संशयिताची भूमिका अत्यंत संशयास्पद असल्याचे तपासात समोर आले आहे. या व्यक्तीची एक खाजगी कार काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ गेली होती. हा रस्ते प्रवास सुरक्षा यंत्रणांसाठी धोक्याची घंटा ठरला असून, यामागील हेतू आणि संशयितांचा हेतू स्पष्ट करण्यासाठी एटीएसकडून कसून चौकशी सुरू आहे. ( ATS Raid)

Pune Police : खाकीतील देवदूतामुळे चिमुकली सुखरूपणे कुटुंबात परतली

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

શેર કરો