शहराच्या वाढत्या गरजांप्रमाणे प्रकल्पांची गती वाढवण्याची ग्वाही
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महापालिकेच्या विकास प्रकल्पांची आढावा बैठक संपन्न
1 મિનિટ વાંચન

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महापालिकेच्या विकास प्रकल्पांची आढावा बैठक संपन्न
निलेश राऊत
पुणे: महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पुणे महापालिकेमध्ये विविध विकास प्रकल्पांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहराच्या सर्वांगीण प्रगतीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.

सदर आढावा बैठकीमध्ये मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (RFD), अमृत योजना, समाविष्ट ११ गावांचा विकास आराखडा (DP), मलनिःसारण प्रकल्प, पाणी प्रक्रिया प्रकल्प, रस्ते विकास प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना व श्रम साफल्य योजना, पाणीपुरवठा योजना, पावसाळ्यापूर्वीची रस्त्यांची कामे व नाला सफाई, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक आराखडा, घनकचरा व्यवस्थापन तसेच नव्याने समाविष्ट २३ गावांमधील नागरी सुविधा (रस्ते, पाणी, सांडपाणी) आणि शाळा व रुग्णालयांचे आधुनिकीकरण व दर्जा सुधारणा या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी शहराच्या वाढत्या गरजांना अनुसरून प्रकल्पांची गती वाढवणे, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी पूर्ण करणे यावर विशेष भर देण्यात आला. पुणेकरांना अधिक सक्षम पायाभूत सुविधा, सुयोग्य नियोजन, स्वच्छ व सुंदर शहर तसेच आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या आणि आगामी विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी विकासकामांना अधिक वेग, गुणवत्ता आणि परिणामकारकता देण्यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीला महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते निलेश निकम, रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या पक्षनेत्या हिमाली कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्षनेते सोपान चव्हाण, शिवसेना उ.बा.ठा.चे पक्षनेते श्नितीन गावडे, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे तसेच संबंधित महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Assurance of increasing the pace of projects as per the growing needs of the city
