મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime News : अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा

મ
મુબારક

1 મિનિટ વાંચન

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : रस्त्यावरील फळविक्रीच्या हातगाड्यांवर कायदेशीर कारवाई करत असताना एकाने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

राजेश दिलीप जगदाळे (रा. हॉचींग शाळेजवळ, तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. साहिल दाभाडे यांनी याबाबत फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात कार्यरत असून ते आपल्या सहकाऱ्यांसह गुरुवारी (दि.१८) दुपारी रस्त्यावरील हातगाड्यांवर कारवाई करत होते. त्यावेळी आरोपी राजेश जगदाळे याने तिथे येऊन “तुमचे काम बंद करा, तुमच्याकडे आदेश आहे का?” असे म्हणत फिर्यादी व त्यांच्या तीन सहकाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना जिजामाता चौक ते स्टेशन रोडवरील स्लीपवेल दुकानासमोर घडली. आरोपीने सरकारी कामात अडथळा आणून दमदाटी करत कर्मचाऱ्यांना तिथून हाकलून दिले. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

assault on Encroachment squad personnel

શેર કરો