મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Japan News : आशियाई क्रीडा स्पर्धेत जपानमध्ये भारताच्या चौघींचा ‘सुवर्णवेग’

Japan News : टोकियो: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला धावपटूंनी ४x४०० मीटर रिले शर्यतीत शानदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

जपानमध्ये भारताच्या चौघींचा ‘सुवर्णवेग’ महिलांच्या ४x४०० मीटर रिलेत बाजी; ३:२९.६९ वेळेसह भारताला ॲथलेटिक्समधील पहिले सुवर्ण
जपानमध्ये भारताच्या चौघींचा ‘सुवर्णवेग’ महिलांच्या ४x४०० मीटर रिलेत बाजी; ३:२९.६९ वेळेसह भारताला ॲथलेटिक्समधील पहिले सुवर्ण

Japan News : महिलांच्या ४x४०० मीटर रिलेत बाजी; ३:२९.६९ वेळेसह भारताला ॲथलेटिक्समधील पहिले सुवर्ण

Japan News : टोकियो: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला धावपटूंनी ४x४०० मीटर रिले शर्यतीत शानदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. किरण पहल, माचेट्टिरा पूवम्मा, प्राची आणि विथ्या रामराज यांच्या चौकडीने ३ मिनिटे २९.६९ सेकंदांची वेळ नोंदवत अव्वल स्थान पटकावले. या स्पर्धेतील ॲथलेटिक्समध्ये भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले.https://maharashtramirror.com/ Japan News

बहरीनच्या संघाने ३ मिनिटे ३०.२१ सेकंदांत शर्यत पूर्ण करत रौप्यपदक मिळवले, तर चीनने ३ मिनिटे ३१.०२ सेकंदांसह कांस्यपदक पटकावले. या सुवर्णासह आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या सुवर्णपदकांची संख्या सहावर पोहोचली.

पूवम्माने भारताला आघाडीवर आणले

किरण पहलने भारतासाठी शर्यतीची सुरुवात केली. तिच्यानंतर अनुभवी माचेट्टिरा पूवम्माने दुसऱ्या टप्प्यात वेग वाढवत भारताला आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या टप्प्यात प्राचीने ही आघाडी कायम राखली आणि अखेरचा टप्पा विथ्या रामराजकडे सोपवला.

अखेरच्या टप्प्यात विथ्याची कमाल

सुवर्णपदक निश्चित करण्याची जबाबदारी विथ्या रामराजवर होती. अखेरच्या टप्प्यात बहरीनकडून सलवा ईद नासरने जोरदार आव्हान दिले. मात्र विथ्याने आपला वेग आणि आघाडी कायम ठेवत सर्वप्रथम अंतिम रेषा पार केली आणि भारताच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.

विथ्याच्या खात्यात आणखी एक पदक

विथ्या रामराजसाठी ही स्पर्धा विशेष ठरली. महिलांच्या ४०० मीटर हर्डल्समध्ये तिने ५४.७५ सेकंदांची वेळ नोंदवत पी. टी. उषा यांचा ४२ वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडला आणि कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर महिला रिले संघासोबत तिने सुवर्णपदकाचीही कमाई केली.

महिलांच्या ४x४०० मीटर रिलेमध्ये भारताने २०१८च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. २०२२च्या स्पर्धेत भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आता २०२६मध्ये भारतीय महिलांनी पुन्हा या प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો