મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai news : राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड आपल्या स्फोटक खेळीमुळे चर्चेत

Mumbai news :मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय द्रविड आपल्या स्फोटक खेळीमुळे चर्चेत आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड आपल्या स्फोटक खेळीमुळे चर्चेत
राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड आपल्या स्फोटक खेळीमुळे चर्चेत

Mumbai news :मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय द्रविड आपल्या स्फोटक खेळीमुळे चर्चेत आहे. त्याने 41 चेंडूंमध्ये 207 च्या धडाकेबाज स्ट्राईक रेटने 85 धावा केल्या. त्याने सात चौकार आणि पाच षटकार मारले. राहुल द्रविड संयमासाठी ओळखले जात होते, पण अन्वय आता वेगळा मार्ग अवलंबत असल्याचे दिसते. तो सध्याच्या क्रिकेटमध्ये स्वतःला सामावून घेत आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news


या 17 वर्षीय खेळाडूने ही खेळी देशातील प्रमुख 19 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा असलेल्या विनू मांकड ट्रॉफीमध्ये खेळली. या स्पर्धेत द्रविडचा मुलगा कर्नाटकचे कर्णधारपद भूषवत आहे. त्याने दिल्लीविरुद्ध एक धडाकेबाज खेळी केली. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्याचे शतक हुकले असले तरी, त्याच्या खेळीने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. वीनू मांकड ट्रॉफी ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे आयोजित केली जाणारी 19 वर्षांखालील मुलांची राष्ट्रीय स्तरावरील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे

ध्रुव कृष्णा आणि नितीश आर्या यांनी शतके झळकावली
अन्वयचे शतक हुकले, पण त्याच्या आधी फलंदाजीला आलेल्या ध्रुव कृष्णा आणि नितीश आर्या यांनी शानदार शतके झळकावली. नितीशने 109 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 6 षटकारांसह 111 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ध्रुव कृष्णाने अवघ्या 51 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 7 षटकारांसह 103 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 202 होता.

कर्नाटकने 49 षटकांत 4184 धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने 49 षटकांत 4184 धावा केल्या. ही खरोखरच एक प्रभावी धावसंख्या होती. विरोधी संघ पूर्णपणे हतबल दिसत होता. या काळात दिल्लीकडून प्रद्युमन सननने सर्वाधिक 2 बळी घेतले. कर्नाटकने 198 धावांनी सामना जिंकला. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला दिल्लीचा संघ पूर्णपणे अपयशी ठरला आणि 41.1 षटकांत 220 धावांवर गारद झाला. त्यामुळे कर्नाटकने 198 धावांनी विजय मिळवला. कर्नाटककडून ध्यान एम. हिरेमठने सर्वाधिक पाच बळी घेतले. दिल्लीकडून अभिराज गगन सिंगने सर्वाधिक 59 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे संघ विजयाच्या जवळपासही पोहोचू शकला नाही. कर्नाटकने एकतर्फी विजय मिळवला. माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर याच्याकडे दिल्लीच्या 19 वर्षांखालील संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू राहुल द्रविडचा मुलगा अन्य द्रवीड याने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कर्नाटककडून खेळताना अवघ्या 41चेंडूत 65 धावांची धडाकेबाज खेळी केली आहे

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો