મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : अंजोर स्पोर्ट्सतर्फे ८९ ज्येष्ठ खेळाडूंचा सन्मान

Pune News :पुणे, : अंजोर फाउंडेशनचे संस्थापक श्री.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

अंजोर स्पोर्ट्सतर्फे ८९ ज्येष्ठ खेळाडूंचा सन्मान
अंजोर स्पोर्ट्सतर्फे ८९ ज्येष्ठ खेळाडूंचा सन्मान

Pune News :पुणे, : अंजोर फाउंडेशनचे संस्थापक श्री. अतुलदादा समर्थ आणि अंजोर फाउंडेशन ट्रस्टच्या टीमच्या वतीने ‘अंजोर स्पोर्ट्स’ अंतर्गत ८९ ज्येष्ठ खेळाडूंचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune News

हॉकी, फुटबॉल, बॉक्सिंग, योग, सायकलिंग तसेच विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ खेळाडूंचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये अर्जुन पुरस्कार तसेच शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित खेळाडूंचाही समावेश होता. विविध क्रीडा प्रकारांतील दिग्गज खेळाडूंना एकाच व्यासपीठावर आणून त्यांचा सन्मान करण्याचा हा विशेष उपक्रम ठरला.https://maharashtramirror.com/ Pune News

यावेळी अंजोर फाउंडेशनचे संस्थापक अतुलदादा समर्थ यांनी क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी CSR (कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी) आणि क्राउडफंडिंगचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले. सरकारच्या विविध योजना आणि उपलब्ध साधनांचा योग्य उपयोग करून खेळाडूंना अधिक चांगल्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील, तसेच समाज आणि उद्योगांच्या सहकार्याने क्रीडा क्षेत्र अधिक सक्षम कसे करता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

“ज्येष्ठ खेळाडूंचा अनुभव ही पुढील पिढीसाठी मोठी संपत्ती आहे. या अनुभवाला योग्य व्यासपीठ देऊन नव्या खेळाडूंना संधी आणि सहकार्य मिळवून देणे, हा अंजोर स्पोर्ट्सचा मुख्य उद्देश आहे,” असे श्री. अतुलदादा समर्थ यांनी सांगितले. या कार्यक्रमातून ज्येष्ठ खेळाडूंचा सन्मान, त्यांच्या अनुभवाचा वारसा आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा संदेश देण्यात आला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો