મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : गणरायाच्या आगमनाची वर्षभर प्रतीक्षा; अमुल गोयल यांनी सांगितला गणेशोत्सवाचा अनुभव

Pune News :पुणे: गणेशोत्सव म्हटलं की प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच उत्सुकता आणि आनंद असतो.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

गणरायाच्या आगमनाची वर्षभर प्रतीक्षा; अमोल गोयल यांनी सांगितला गणेशोत्सवाचा अनुभव
गणरायाच्या आगमनाची वर्षभर प्रतीक्षा; अमोल गोयल यांनी सांगितला गणेशोत्सवाचा अनुभव

Pune News :पुणे: गणेशोत्सव म्हटलं की प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच उत्सुकता आणि आनंद असतो. पुष्पा गंगा समूहाचे सर्वेसर्वा अमुल गोयल यांनी महाराष्ट्र मिररशी संवाद साधताना आपल्या घरातील गणेशोत्सव आणि गणरायाबद्दलची भावना व्यक्त केली. गणपती बाप्पाच्या आगमनाची आपल्या कुटुंबाला वर्षभर उत्सुकता असते. बाप्पाचे आगमन, त्यांची पूजा आणि कुटुंबासोबत साजरा होणारा हा उत्सव हा आनंदाचा आणि भावनेचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Pune News

गणपती उत्सवाबद्दलच्या या आठवणींसोबतच त्यांनी बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रावरही भाष्य केले. आजच्या काळात अनेकदा घर आणि व्यावसायिक बांधकाम समूह ]यामधील फरक कमी होताना दिसतो. मात्र, घर बांधताना ते केवळ एक आराखडा न राहता त्यात राहणाऱ्या व्यक्तीला 'हे माझं घर आहे’ अशी भावना आणि आराम मिळाला पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी सांगितले https://maharashtramirror.com/ pune News amul goel

एखादे घर बांधताना ‘आपण स्वतः या घरात राहिलो असतो तर आपल्याला कसा हवा असता?’हा विचार केला जातो. ग्राहकासाठी घर उभारताना ते स्वतःच्या घराप्रमाणे समजून बांधले, तर त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा अनुभव वेगळा मिळतो, असे गोयल यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही वर्षांत रिअल इस्टेट क्षेत्रात मोठे बदल झाले असून तंत्रज्ञान आणि एआय मुळे या क्षेत्रातही नवे बदल होत आहेत. या बदलांशी जुळवून घेत पुढे जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. रिअल इस्टेट क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नव्या पिढीबाबत बोलताना, “इतकी वर्षे या क्षेत्रात असूनही मी आजही शिकत आहे,” असे सांगत त्यांनी स्वतःला सल्ला देण्याच्या भूमिकेत ठेवले नाही. मात्र या क्षेत्रात यायचे असेल तर मनापासून आणि इच्छा शक्तीने काम करा आणि कामाशी प्रामाणिक राहा कारण याच गोष्टी दीर्घकाळ महत्त्वाच्या ठरतात, असा संदेश त्यांनी दिला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://maharashtramirror.com/

શેર કરો