મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : अमोल बालवडकरांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचे पुस्तक देत भाजपला डिवचले

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पुणे महापालिकेच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि सत्ताधारी भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

अमोल बालवडकरांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचे पुस्तक देत भाजपला डिवचले
अमोल बालवडकरांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचे पुस्तक देत भाजपला डिवचले

Pune News : पुणे महापालिकेत महायुतीतील संघर्ष तीव्र

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पुणे महापालिकेच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि सत्ताधारी भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. प्रभागातील विकासकामांचा निधी शून्य केल्याच्या वादातून एकमेकांवर वारपलटवार केले जात आहेत. मंगळवारी झालेल्या मुख्य सभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी भाजप नेत्यांना चक्क डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे जीवनचरित्र असलेले पुस्तक भेट देत पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पुणे मनपा सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर आधारित लिखित पुस्तक भेट दिले. त्यामुळे, हे पुस्तक वाचल्यानंतर गणेश बिडकर आता किमान पाच मिनिटे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनकार्यावर बोलतील असा उपरोधिक टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

अमोल बालवडकरांचे भाजपला आवाहन

पुणे महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर आणि नगरसेविका अर्चना पाटील यांनी एक प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावानुसार, भारताचे पहिले उद्योग आणि पुरवठामंत्री तथा भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे तैलचित्र महापालिकेत लावले जावे आणि दरवर्षी त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. https://maharashtramirror.com/ Pune News

हा प्रस्ताव मंजूर होत असतानाच राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी एक उपसूचना पुढे करत संपूर्ण राजकारणाला कलाटणी दिली. बालवडकर यांनी प्रस्तावात सुधारणा सुचवताना म्हटले की, डॉ. मुखर्जी हे केवळ तैलचित्रापुरते मर्यादित नसून, “भारताच्या अखंडतेसाठी बलिदान देणारे, ३७० कलमाला सर्वप्रथम विरोध करणारे आणि ‘एक देश में दो विधान, एक देश में दो निशान, एक देश में दो प्रधान नहीं चलेंगे’ अशी सिंहगर्जना करणारे ते राष्ट्रभक्त होते.” एवढेच नव्हे तर, या महान नेत्याविषयी सभागृहातील प्रत्येक नगरसेवकाने किमान दहा मिनिटे भाषण करावे, जेणेकरून त्यांच्या विचारांची माहिती सर्वांना होईल, असे आव्हानच त्यांनी दिले. https://maharashtramirror.com/ Pune News

भाजप नेत्यांची उडाली तारांबळ

बालवडकर यांच्या या उपरोधिक आणि अभ्यासपूर्ण आव्हानामुळे सत्ताधारी भाजपच्या गोटात अक्षरशः शांतता पसरली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या वैचारिक वारशाचा दावा करणाऱ्या भाजप पक्षाच्या एकाही नगरसेवकाला किंवा नेत्याला त्यांच्यावर सविस्तर बोलण्याचे धाडस दाखवता आले नाही. आपला वैचारिक पेच निर्माण झाल्याचे लक्षात येताच भाजप नगरसेवकांमध्ये चलबिचल सुरू झाली. https://maharashtramirror.com/ Pune News

यावेळी गणेश बिडकर यांनी आक्रमक होत, “आमच्या पक्षाच्या संस्थापकांची चेष्टा सहन केली जाणार नाही,” असे म्हणत बालवडकर यांच्या उपसूचनेचा तीव्र निषेध नोंदवला. मात्र, या संपूर्ण गदारोळात भाजपचा एकही नगरसेवक मुखर्जींच्या कार्यावर दहा मिनिटे बोलण्यासाठी पुढे सरसावला नाही. अखेरीस, आपले राजकीय ‘इप्सित साध्य’ झाल्यानंतर अमोल बालवडकर यांनी आपली उपसूचना मागे घेतली. https://maharashtramirror.com/ Pune News

पुस्तक भेट देत पुन्हा डिवचले

यानंतर राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चा अजून थंड होत नाहीत तोच, गुरुवारी अमोल बालवडकर यांनी थेट गणेश बिडकर यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे पुस्तक भेट म्हणून दिले. एका अर्थाने गांधीगिरी करत विरोधकांना त्यांच्याच वैचारिक नेत्याचा इतिहास वाचण्याचा सल्ला बालवडकर यांनी याद्वारे दिला. https://maharashtramirror.com/ Pune News

या संपूर्ण प्रकरणामुळे पुणे महापालिकेच्या वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगली असून, एका बाजूला निधी कपातीचे राजकारण सुरू असताना अमोल बालवडकरांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारत भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातीली हा अंतर्गत कलह आगामी काळात आणखी रंगणार का? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

શેર કરો